रेल्वे रिझर्वेशन तिकीट चार्जेस
मुंबई, 9 एप्रिल: रेल्वे हा देशातील सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. दररोज लाखो प्रवासी त्यांच्या निश्चित स्थळावर पोहोचण्यासाठी रेल्वेने प्रवास करतात. ट्रेनमध्ये नेहमीच गर्दी असते. अशा वेळी प्रवासी अनेक महिन्यांपूर्वीच प्रवासाचे नियोजन करून रिझर्व्हेशन करतात. आजकाल बहुतांश लोक रेल्वेचे आरक्षण फक्त ऑनलाइनच करतात. रेल्वे रिझर्वेशन करताना, रेल्वे प्रवाशांकडून विविध प्रकारचे चार्जेस देखील घेते. ज्याची फार कमी लोकांना माहिती असते. यासोबतच तुम्ही कोणत्या ट्रेनमध्ये कोणत्या क्लासमध्ये आरक्षण करत आहात यावरही रेल्वेचे चार्जेस अवलंबून असतात. आज आपण जाणून घेऊया रेल्वे तिकिटात लावल्या जाणाऱ्या चार्जेसविषयी सविस्तर…
ट्रेनमध्ये रिझर्वेशन करताना, रेल्वे प्रवाशांकडून मूळ भाड्याव्यतिरिक्त, रिझर्वेशन चार्ज, जीएसटी, केटरिंग चार्ज, सुपर फास्ट चार्ज (जर तुमची ट्रेन सुपरफास्ट असेल), डायनॅमिक चार्ज यांसारखे अनेक चार्जेस सामिल केले जातात. यासोबतच ट्रेनचे मूळ भाडे तुम्ही कोणत्या क्लासमध्ये प्रवास करत आहात यावर अवलंबून असते.
Railway Track Stones: रेल्वे ट्रॅकवर का असतात टोकदार दगडं? जाणून घ्या रोचक तथ्यउदाहरणार्थ, IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर, गुवाहाटी ते नवी दिल्ली दरम्यान धावणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसमध्ये 3 AC मध्ये प्रवास करण्यासाठी, तुम्हाला 3,770 रुपये शुल्क भरावे लागेल.या भाड्यात तुम्हाला मूळ भाडे 2007 रुपये, रेल्वे रिझर्वेशन चार्जेस 40 रुपये, ट्रेन सुपरफास्ट चार्ज 45 रुपये, केटरिंग चार्ज 710 रुपये, जीएसटी चार्ज 146 रुपये, डायनॅमिक फेअर चार्ज रुपये 803 रुपये द्यावे लागतील. या प्रकरणात, ट्रेनचे एकूण भाडे रु.3770 असेल. हे भाडे राजधानीसारख्या प्रीमियम ट्रेनचे आहे. शताब्दी, तेजस, दुरांतो गाड्यांचे भाडे आणि मूळ भाडे जास्त आहे.
रेल्वे रुळाला गंज का लागत नाही? कधी विचार केलाय? इंट्रेस्टिंग आहे कारणयासोबतच एक्स्प्रेस गाड्यांचे भाडे शताब्दी, तेजस इत्यादी प्रीमियम गाड्यांपेक्षा कमी आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनपासून मुंबईच्या वांद्रे टर्मिनस रेल्वे स्टेशनपर्यंत जाणाऱ्या संपर्क क्रांती एक्सप्रेसमध्ये स्लीपर कोचमध्ये रिझर्वेशन केलं असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे भाडे द्यावे लागेल. यामध्ये मूळ भाडे 565 रुपये आहे. त्याच वेळी, रिझर्वेशन चार्ज 20 रुपये आणि सुपरफास्ट ट्रेनचे चार्ज 30 रुपये आहे. अशा वेळी तुम्हाला या ट्रेनसाठी एकूण 615 रुपये मोजावे लागतील.