नवी दिल्ली, 22 मार्च: देशात एका आर्थिक वर्षात 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न हे टॅक्सच्या अर्थात कर (Income Tax) कक्षेत येतं. केवळ नोकरीच्या माध्यमातूनच नव्हे तर इतर स्रोतांमधून मिळणाऱ्या उत्पन्नावरही कर भरावा लागतो. यात व्याजतून (Interest) मिळणारं उत्पन्न, इतर कोणत्याही व्यवसायातील उत्पन्न आणि कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूकीतून मिळणारं उत्पन्न यांचा समावेश असतो. तथापि, आयकर कायद्यांतर्गत भविष्य निर्वाह निधी (पीएफ), कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) किंवा राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अर्थात नॅशनल पेन्शन स्किम व्यतिरिक्त अन्य पाच उत्पन्नाचे स्रोत असेही आहेत की त्यावर कोणताही कर लागू नसतो. याशिवाय शेतीतून (Farming) मिळणारं उत्पन्न कराच्या कक्षेत येत नाही. याचाच अर्थ शेतकरी शेतीतून जे काही उत्पन्न मिळवतो, त्यावर त्याला कोणताही कर भरावा लागत नाही. विवाहप्रसंगी मिळालेली भेट सर्वसाधारणपणे आयकर कायद्याअंतर्गत भेटवस्तू (Gift) या कराच्या कक्षेत येतात. परंतु, जर तुम्हाला एखादी भेटवस्तू लग्नात मिळाली तर त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर 100 टक्के कर सवलत मिळते. मात्र, याकरिता लग्नाच्या तारखेला किंवा आसपासच्या तारखेजवळ भेटवस्तू मिळाली असावी, अशी अट आहे. करदात्याला एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 50,000 रुपयांपर्यंतच्या भेटवस्तूंवर कोणताही कर भरावा लागत नाही. मात्र या रकमेपेक्षा अधिक किमतीची भेटवस्तू उत्पन्नाशी जोडली गेली तर त्यावर स्लॅब नुसार कर भरावा लागतो. हे वाचा- PM Awas Yojna मधील नियमांत बदल, घर भाडेतत्वावर दिले तर रद्द होऊ शकतो करार भागीदारी कंपनीकडून नफा जर तुम्ही एखाद्या कंपनीत भागीदार (Partner) असाल, तर नफ्याचा शेअर (Profit Share) म्हणून मिळालेली रक्कम करपात्र नसते. म्हणजेच त्यावर कोणाताही कर भरावा लागणार नाही, कारण संबंधित कंपनीने त्यावरील कर आधीच भरलेला असतो. ही कर सूट केवळ नफ्यावर असते, मिळणाऱ्या वेतनावर नाही. शिक्षणादरम्यान मिळणारी स्कॉलरशीप आयकर कायद्यांतर्गत, देशात किंवा परदेशात शालेय ते महाविद्यालयीन स्तरापर्यंतच्या सर्व प्रकराच्या शिक्षणादरम्यान मिळालेल्या शिष्यवृत्ती अर्थात स्कॉलरशीपवर (Scholarship) 100 टक्के कर सूट दिली जाते. याशिवाय सरकारी किंवा खासगी संस्थांकडून अभ्यास किंवा संशोधनासाठी मिळालेल्या स्कॉलरशीपवर कोणताही कर भरावा लागत नाही. पालकांकडून मिळालेली वडिलोपार्जित मालमत्ता आई-वडिलांकडून मिळालेली मालमत्ता (Property) (निवासी किंवा व्यावसायिक), दागिने आणि रोख रक्कमेवर करदात्याला कोणताही कर भरावा लागत नाही. मग ती वडिलोपार्जित मालमत्ता म्हणून मिळाली असेल किंवा इतर कोणत्याही मृत्यूपत्राच्या माध्यमातून मिळालेली असेल. तथापि, जर करदात्याने पैसे गुंतवून पैसे कमावले आणि मालमत्तेतून उत्पन्न किंवा व्याज मिळवले तर त्याला यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर भरावा लागेल. हे वाचा- ‘या’ शेअरमुळे वर्षभरात 600% परतावा, कंपनी आता स्टॉक स्प्लिट करण्याच्या तयारीत ग्रॅज्युइटीतून मिळालेलं 20 लाखांपर्यंतचं उत्पन्न एखाद्या कर्मचाऱ्याने सलग पाच वर्षं किंवा त्याहून अधिक काळ एखाद्या संस्थेत काम केलं असेल, तर नोकरी सोडल्यावर मिळणारी ग्रॅच्युइटीची (Gratuity) रक्कम ही कर सवलतीच्या कक्षेत येते. सरकारी कर्मचाऱ्याच्या बाबतीत 20 लाख रुपयांपर्यंत आणि खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या बाबतीत 10 लाखांपर्यंतच्या ग्रॅच्युइटीच्या रकमेवर कर द्यावा लागत नाही. रिटर्न भरण्यापूर्वी अचूक करा कॅल्क्युलेशन गुंतवणूक आणि कर सल्लागार स्विटी मनोज जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, करदात्यांनी रिटर्न भरण्यापूर्वी करपात्र उत्पन्नाची अचूक कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. आयकर कायद्यानुसार, पीएफ (PF), पीपीएफ (PPF), ईपीएफ (EPF) आणि एनपीएससोबत (NPS) वर नमूद स्त्रोतांकडून मिळणारं उत्पन्न हे करपात्र नाही. याशिवाय 10 (10) D मध्ये कोणत्याही विमा पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर मिळालेली रक्कमदेखील करमुक्त आहे.