JOIN US
मराठी बातम्या / मनी / ITR Filing : आयकर भरण्याची शेवटची तारीख विसरु नका, उशीर केला तर जेलही होऊ शकते

ITR Filing : आयकर भरण्याची शेवटची तारीख विसरु नका, उशीर केला तर जेलही होऊ शकते

करदाते त्यांच्या कर स्लॅबनुसार (Income tax) Slab) दंड भरून आयटीआर पूर्ण करू शकतात. आयटीआर 31 मार्चपर्यंत भरला नाही तर कर भरावा लागल्यानंतर कमीत कमी 3 वर्षे आणि कमाल 7 वर्षांची शिक्षा होऊ शकते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 जानेवारी : आयकर भरण्याची मुदत वाढवल्याने करदात्यांनी दिलासा मिळाला आहे. मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी आयकर रिटर्न किंवा ITR भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 होती. मात्र आता प्राप्तिकर विभाग (Income tax Department) काही दंड आणि विलंब शुल्कासह 31 मार्च 2022 पर्यंत रिटर्न (ITR last date) भरण्याची सुविधा देत आहे. या देय तारखेपर्यंत रिटर्न भरले नाही तर सरकार तुमच्यावर खटला चालवू शकते. 31 डिसेंबरपर्यंत रिटर्न भरण्यात अयशस्वी झालेले करदाते त्यांच्या कर स्लॅबनुसार (Income tax) Slab) दंड भरून आयटीआर पूर्ण करू शकतात. आयटीआर 31 मार्चपर्यंत भरला नाही तर कर भरावा लागल्यानंतर कमीत कमी 3 वर्षे आणि कमाल 7 वर्षांची शिक्षा होऊ शकते. अशा करदात्यांकडून, आयकर विभाग थकित कर आणि व्याज व्यतिरिक्त 50 ते 200 टक्के दंड देखील लावू शकतो. सरकारची इच्छा असेल तर ते करदात्यावर खटलाही चालवू शकताच. येत्या 1 फेब्रुवारीपासून काही नियम बदलणार, तुमच्यावर काय परिणाम होणार? चेक करा 10 हजारांपेक्षा जास्त थकबाकी असेल तर अडचण येऊ शकते प्राप्तिकर नियमांनुसार, आयटीआर दाखल करण्यात अपयशी ठरणाऱ्या प्रत्येक करदात्यावर सरकार कारवाई करत नाही. जेव्हा कर दायित्व 10,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तेव्हाच आयकर विभाग खटल्यांची कार्यवाही सुरू करतो. जर करपात्र उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर करदात्याला 5000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. मात्र जर करपात्र उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर दंडाची रक्कम 1000 रुपये असेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या