एलआयसी पॉलिसी
नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी: जीवन जगत असताना कधी कोणती परिस्थिती येईल हे सांगता येत नाही. अनेकदा अचाकन असं काही तरी काम येतं की, पैशांची खूप जास्त गरज भासते. अशा वेळी मग आपण विविध ठिकाणी सेविंग करत असलेल्या पैशांचा विचार करतो. आपल्या वाईट काळात आपली बचत हे सर्वात मोठे वरदान ठरते. बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, त्यापैकी बरेच लोक LIC मध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. जर तुम्हीही एलआयसी पॉलिसी केली असेल आणि काही कारणास्तव ती सरेंडर करण्याचा विचार करत असाल, तर आधी नियम आणि कायदे जाणून घ्या. LIC पॉलिसी मध्येच बंद करणे याला पॉलिसी सरेंडर करणे म्हणतात. तुम्ही किमान 3 वर्षानंतरच LIC पॉलिसी सरेंडर करू शकता. जर तुम्ही 3 वर्षापूर्वी केले तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत.
कोणतेही तारण न ठेवता मिळवा 10 लाखांच कर्ज, ही सरकारी योजना देतेय लोन !पॉलिसी सरेंडर केल्यावर, तुम्हाला एलआयसीच्या नियमांवर आधारित सरेंडर व्हॅल्यू मिळते. म्हणजेच जर तुम्ही पॉलिसी बंद करण्याचा किंवा LIC मधून पैसे काढण्याचा निर्णय घेतला, तर तुम्हाला त्याच्या किमतीएवढी रक्कम परत मिळते त्याला सरेंडर व्हॅल्यू म्हणतात. तुम्ही संपूर्ण तीन वर्षांसाठी एलआयसीचा प्रीमियम भरला असेल, तरच तुम्हाला सरेंडर व्हॅल्यू मिळू शकेल.
LIC पॉलिसीधारकांसाठी गुडन्यूज! आता मिळणार ‘ही’ सुविधापॉलिसी सरेंडर केल्याने ग्राहकांना खूप तोटा सहन करावा लागतो. एलआयसी पॉलिसी मॅच्युरिटीपूर्वी सरेंडर केल्याने त्याचे मूल्य कमी होते. समजा तुम्ही 3 वर्षांसाठी प्रीमियम भरला असेल तर तुम्ही सरेंडर व्हॅल्यूसाठी पात्र आहात. त्यानंतर तुम्हाला भरलेल्या प्रीमियमच्या फक्त 30% मिळेल परंतु पहिल्या वर्षाचा प्रीमियम मिळणार नाही. म्हणजे पहिल्या वर्षी तुम्ही भरलेले प्रीमियम पैसेही झिरो होतात.
पॉलिसी सरेंडर करण्यासाठी, LIC सरेंडर फॉर्म नंबर 5074 आणि NEFT फॉर्म आवश्यक आहे. या फॉर्म्ससोबत, तुम्हाला तुमच्या पॅन कार्डची एक कॉपी आणि पॉलिसीच्या मूळ कागदपत्र द्यावी लागेल. तुम्ही पॉलिसी का सोडत आहात हे हाताने लिहिलेले पत्र देखील द्यावे लागेल.