JOIN US
मराठी बातम्या / मनी / Online Loan App: ऑनलाईन कर्ज घेत असाल तर सावधान! तुमच्यासोबतही हे घडू शकतं

Online Loan App: ऑनलाईन कर्ज घेत असाल तर सावधान! तुमच्यासोबतही हे घडू शकतं

जर तुम्ही ऑनलाइन डिजिटल लोन घेणार असाल किंवा ते घेण्याचा विचार करत असाल तर सावध राहा.

जाहिरात

(फोटो सौजन्य - Canva)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : बऱ्याचदा आपल्याला पैशांची गरज असते. अशावेळी बँकेची अधिकारी लोन देण्यात विलंब लावतात. मग अशा परिस्थितीमध्ये आपण कुठेतरी ऑनलाइन अॅपद्वारे पैसे मिळणार अशी जाहिरात पाहातो आणि त्यावर विश्वास ठेवून कर्ज घ्यायला जातो. तुम्ही जर अशी चूक केली असेल किंवा करण्याचा विचार करत असाल तर सावधान. जर तुम्ही ऑनलाइन डिजिटल लोन घेणार असाल किंवा ते घेण्याचा विचार करत असाल तर सावध राहा. बऱ्याचदा अशा पद्धतीने कर्ज घेऊन लोक अडकतात आणि त्यांना फसवलं जातं. यातून नैराश्य येतं आणि टोकाचं पाऊल उचललं जातं. या चुका टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याबाबत आज आम्ही सांगणार आहोत. डिजिटल कर्ज देणाऱ्या App चं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना महामारीच्या काळात ऑनलाइन आणि डिजिटल लेंडिंगची लोकप्रियता झपाट्याने वाढली आहे. बँकेत बऱ्याचदा लवकर लोन मिळत नाही अनेक अडचणी येतात म्हणून लोक अशा प्रकारच्या अॅपकडे वळतात.

ग्राहकांना मोठा दणका! 3 बँकांनी वाढवलं व्याजदर, पाहा तुमच्यावर किती वाढणार EMI चा बोजा

बँकेत कर्जासाठी अर्ज करायचा म्हणजे ढिगानं कागदपत्र, रांगेत उभं राहावं लागतं अथवा अनेक व्हेरिफिकेशन प्रक्रियेतून जावं लागतं. पण खरं तर ही प्रक्रिया किचकट असेल तरी ती सुरक्षित असते. अॅपद्वारे झटपट लोनसाठी पैसे मिळत असले तरी त्यातून होणारे धोके आणि समस्या फार गंभीर आहे. डिजिटल लेंडिंग प्लॅटफॉर्ममुळे कर्जेही पेपरलेस झाली. स्मार्टफोनवर तुम्ही 15-20 मिनिटांत लोन अॅप्लिकेशन भरून पूर्ण करू शकता. डिजिटल लोनसाठी अर्ज करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. अॅपची माहिती घेणं आवश्यक आहे. यासोबत अर्ज करण्याआधी पात्रता तपासणं गरजेचं आहे. प्रत्येक डिजिटल लेंडिंग अॅपचा दर्जा वेगळा असतो. प्रत्येक डिजिटल लेंडिंग अॅपचा दर्जा वेगळा असतो. समजा तुम्ही दरमहा 15 हजार रुपये कमावता. डिजिटल लोनसाठी त्याच्या कॅटेगरी वेगवेगळ्या असतील. तर दरमहा 50000 कमावणाऱ्या व्यक्तीसाठी पात्रतेची अट वेगळी असेल.

होम लोनची परतफेड करताना कोणता पर्याय ठरेल फायद्याचा? जाणून घ्या

संबंधित बातम्या

डिजिटल लेंडिंग अॅपवर अर्ज केल्यास तुमचे बँक स्टेटमेंट, पत्ता आणि आयडी प्रूफ अशी सर्व कागदपत्रे तपासा. कोणत्याही प्रकारच्या कर्जाची म्हणजेच व्याजाची किंमत मोजावी लागेल. कर्ज घेण्यापूर्वी त्याची परतफेड करण्याचा विचार करा. ग्राहकांना कर्ज घेण्यापूर्वी आणि नंतर परतफेड कशी करायची याचे नियोजन करावे लागेल. तुम्ही ज्या App वरून कर्ज घेताय ते किती सुरक्षित आहे हे तपासा. याआधी फ्रॉड केले नाहीत ना? हे देखील तपासा. नाहीतर तुमच्या फोनमधील फोटो, फोननंबरचा वापर तुम्हाला ब्लॅकमेल करण्यासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे अॅपची सुरक्षितता आणि विश्वासनियता तपासा. थर्ड पार्टी अॅपवरून लोन घेणं टाळा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या