JOIN US
मराठी बातम्या / मनी / खासगी कंपनीत जर 10 वर्षं नोकरी केली असेल तर मिळू शकते पेन्शन, 'ही' आहे अट!

खासगी कंपनीत जर 10 वर्षं नोकरी केली असेल तर मिळू शकते पेन्शन, 'ही' आहे अट!

ईपीएफओच्या नियमांनुसार खासगी कर्मचारीदेखील पेन्शनची सुविधा घेऊ शकतात. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या पगारातील मोठा हिस्सा पीएफ म्हणून कापला जातो

जाहिरात

ईपीएफओच्या नियमांनुसार खासगी कर्मचारीदेखील पेन्शनची सुविधा घेऊ शकतात. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या पगारातील मोठा हिस्सा पीएफ म्हणून कापला जातो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सरकारी नोकरीतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना शासनातर्फे निवृत्तीवेतन म्हणजेच पेन्शन दिली जाते. खासगी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही सुविधा मिळत नाही, असा आपला समज आहे. मात्र, ईपीएफओच्या नियमांनुसार खासगी कर्मचारीदेखील पेन्शनची सुविधा घेऊ शकतात. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या पगारातील मोठा हिस्सा पीएफ म्हणून कापला जातो. हे पैसे दरमहा कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात जमा होतात. नियमांनुसार, दरमहा कर्मचार्‍यांच्या मूळ पगाराच्या 12 टक्के प्लस डीए पीएफ खात्यात जमा केला जातो. त्यापैकी कर्मचार्‍यांचा पगारातून कट झालेले पैसे EPF मध्ये जातात, तर कंपनीने दिलेल्या योगदानातील 8.33 टक्के हिस्सा कर्मचारी पेन्शन योजनेत (EPS) व 3.67 टक्के हिस्सा EPFमध्ये जातो. जर तुम्ही 10 वर्षे खासगी नोकरी केली तर या जमा झालेल्या पैशांतून तुम्हाला पेन्शन मिळू शकेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी एकच अट आहे. कर्मचाऱ्यानं ती अट पूर्ण करणं आवश्यक आहे. ‘अशी’ मिळू शकते पेन्शन ईपीएफओच्या नियमांनुसार, सलग 10 वर्षं नोकरी केल्यानंतर, खासगी कर्मचारी पेन्शन मिळण्यास पात्र ठरतो. मात्र, नोकरीचा कालावधी 10 वर्षांचा असावा. नऊ वर्षे सहा महिने नोकरी झाली असेल तरी त्याची 10 वर्षे ग्राह्य धरली जातात. परंतु, जर नोकरीचा कालावधी साडेनऊ वर्षांपेक्षा कमी असेल तर तो केवळ नऊ वर्षे ग्राह्य धरला जातो. जर साडेनऊ वर्षांपेक्षा कमी सेवा झाली असेल तर कर्मचारी निवृत्तीचं वय पूर्ण होण्यापूर्वीच पेन्शन खात्यात जमा केलेली रक्कम काढू शकतो. कारण त्याला पेन्शन मिळू शकत नाही. (SBI च्या विशेष एफडी योजनेची मुदत ‘या’दिवशी संपणार; ग्राहकांना सर्वात जास्त व्याजदर देते उत्सव डिपॉझिट स्कीम) कर्मचाऱ्यानं दोन वेगवेगळ्या संस्थांमध्ये पाच-पाच वर्षं काम केलं असेल, तर काय? किंवा दोन नोकऱ्यांमध्ये दोन वर्षांचं अंतर असेल तर त्या कर्मचाऱ्याला पेन्शन मिळू शकेल का? असा प्रश्न उपस्थित होणं साहजिक आहे. कारण, कधीकधी लोक त्यांच्या नोकऱ्या गमावतात. विशेषत: स्त्रिया त्यांच्यावरील जबाबदाऱ्यांमुळे मध्येच नोकरीतून ब्रेक घेतात आणि काही वर्षांनी पुन्हा नोकरी सुरू करतात. अशा परिस्थितीत त्यांचा 10 वर्षांचा कार्यकाळ कसा पूर्ण होणार आणि त्यांना पेन्शन योजनेचा लाभ कसा मिळणार? हे जाणून घेणं गरजेचं आहे. EPFO नियम काय सांगतात? ईपीएफओच्या नियमांनुसार, दोन ठिकाणच्या नोकरीतील अंतर कितीही असलं तरी, सर्व ठिकाणचा कार्यकाळ एकत्र जोडून 10 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला जाऊ शकतो. फक्त, कर्मचाऱ्यानं प्रत्येक ठिकाणी यूएएन (Universal Account Number) क्रमांक बदलू नये. प्रत्येक ठिकाणी एकच युएएन क्रमांक वापरल्यास त्याच क्रमांकावर 10 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होऊ शकतो. यूएएन एकच असेल तर PF खात्यात जमा केलेले संपूर्ण पैसे त्याच यूएएनमध्ये दिसतात. दोन नोकऱ्यांमध्ये काही काळ गॅप असल्यास तो काढून टाकून कार्यकाळ एक मानला जातो. म्हणजेच, पूर्वीची नोकरी आणि नवीन नोकरी यातील अंतर काढून टाकलं जातं. (दुर्मिळ नोटा आणि नाणी जमवण्याच्या छंदामुळे अडचणीत याल; RBI ने केलं सावध) सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास… तुम्ही सध्याच्या कंपनीत गेली पाच वर्षं काम करत आहात. या पूर्वी नोकरी गेल्याने किंवा कोणत्याही कारणानं तुम्ही जवळपास दोन वर्षं घरी बसून होता. त्या पूर्वी तुम्ही ज्या संस्थेत काम केलं होतं तिथे सलग सहा वर्षांचा कार्यकाळ तुम्ही पूर्ण केला आहे. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही दोन्ही ठिकाणी एकच यूएएन क्रमांक वापरला असेल तर दोन्ही नोकऱ्यांमध्ये अंतर असूनही तुम्ही पेन्शन मिळण्यास पात्र ठरता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या