मुंबई, 02 सप्टेंबर : तुम्ही नोकरी करताय? पण गुंतवणूक कशी करायची, कुठे करायची ते कळत नाहीय. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोत, गुंतवणुकीचे चार चांगले पर्याय. बँक आरडी बँकेत रिकरिंग डिपाॅझिट ठेवणं हा एक चांगला पर्याय आहे. त्यात तुम्हाला 7.5 टक्के ते 9 टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकतं. अनेक बँकांत तुम्ही रिकरिंग डिपाॅझिट 100 रुपयांपासून सुरू करू शकतात. जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयापर्यंत तुम्ही रक्कम ठेवू शकता. खूशखबर! सोनं झालं स्वस्त, ‘हे’ आहेत सोमवारचे दर सोनं सोन्यात गुंतवणूक हा चांगला पर्याय आहे. गोल्ड ETF हीसुद्धा योजना आहे. यात सोनं चोरी होण्याची शक्यता राहात नाही. सोन्याची नाणीही घेऊ शकता. पुढे जाऊन सोन्यातून चांगली रक्कम हातात येऊ शकते. आंतरराष्ट्रीय बाजारात जून महिन्यामध्ये सोन्याच्या भावाने 5 वर्षांतला उच्चांक गाठला होता. गुंतवणूकदारांनी सोन्यामधल्या गुंतवणुकीला पसंती दिल्यामुळे ही स्थिती होती. आता मात्र घटलेल्या दरांमुळे दिलासा मिळाला आहे. आधार अपडेट करायचंय? ‘अशी’ आहे सोपी पद्धत भारतात दरवर्षी सुमारे 500 ते 600 टन इतक्या सोन्याची आयात होते. सोन्याचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले तर खरेदीतही घट होते. पण आता सोन्याबरोबरच चांदीचेही भाव घटल्यामुळे विक्रीमध्ये तेजी येईल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर सोन्याचे दर आणखी खाली येऊ शकतात, असाही त्यांचा अंदाज आहे. इक्विटी म्युच्युअल फंड नोकदारांनी म्युच्युअल फंडात पैसे गुंतवावे. SIP केलं तर नियमित पगारातून पैसे कापले जातील. ही एक चांगली गुंतवणूक समजली जाते. तुम्ही 500 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. LIC नं लाँच केली नवी पाॅलिसी, ‘हे’ आहेत फायदे पब्लिक प्राॅव्हिडंट फंड ( PPF ) बऱ्याच काळासाठी तुम्ही ही गुंतवणूक करू शकता. यात धोका नसतो. तुम्हाला 7.9 टक्के दरानं व्याज मिळतं. यातून मिळणारं व्याज टॅक्स फ्री असतं. आणि म्यॅच्युरिटीनंतर मिळणारी रक्कमही करमुक्त असते. यात पैसे गुंतवले तर इन्कम टॅक्स रिटर्न भरताना फायदा होऊ शकतो. कोल्हापूरच्या राज घराण्यातील गणेश; न्यू पॅलेसमध्ये बाप्पा विराजमान!