JOIN US
मराठी बातम्या / मनी / ICICI बँक व्हिडिओकॉन लोन घोटाळा, केंद्रीय तपास यंत्रणेला हायकोर्टाचा दणका

ICICI बँक व्हिडिओकॉन लोन घोटाळा, केंद्रीय तपास यंत्रणेला हायकोर्टाचा दणका

ICICI-Videocon Loan Case: वेणूगोपाल धूत यांना जामीन मंजूर,1 लाखाच्या जामीनावर तात्काळ कारागृहातून सुटका करण्याचे निर्देश

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : आयसीआयसीआय बँक आणि व्हिडीओकॉन कर्ज घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. चंदा कोचर यांच्या प्रमाणेच वेणूगोपाल धूत यांनाही हायकोर्टाचा दिलासा मिळाला आहे. 1 लाखाच्या जामीनावर तात्काळ कारागृहातून सुटका करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तपासांत सहकार्य करावं, साक्षी पुराव्यांशी कोणतीही छेडछाड करू नये असे आदेश कोर्टाकडून देण्यात आले आहेत. पासपोर्ट जमा करून विनापरवानगी देशाबाहेर जाऊ नये असे निर्देश दिले आहेत. केंद्रीय तपासयंत्रणेला मुंबई उच्च न्यायालयाचा आणखीन एक दणका बसला आहे. याचिकेत हस्तक्षेप करणा-यांची याचिका हायकोर्टानं 25 हजारांचा दंड आकारत फेटाळली आहे. त्यामुळे आता वेणुगोपाल धूत यांना जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ICICI बँकेकडून अलर्ट, या ग्राहकांना Transaction वर भरावे लागणार जास्त पैसे

संबंधित बातम्या

नेमकं काय आहे प्रकरण यापूर्वी ईडीने 3000 कोटींच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. या आरोपांनंतर त्यांना 2018 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या कर्जाच्या बदल्यात व्हिडिओकॉनच्या प्रवर्तकांनी चंदा कोचर यांच्या पतीला कोट्यवधी रुपये दिल्याचा सीबीआयचा आरोप आहे.

व्हिडीओकॉन कंपनीला ICICI बँकेनं नियम धाब्यावर बसवून कर्ज दिलं होतं. हे कर्ज 2009 ते 2011 दरम्यान देण्यात आलं होतं. हे कर्ज देणाऱ्या समितीमध्ये चंदा कोचर यांचाही समावेश होता. त्यामुळे हे प्रकरण बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलण्यात आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या