JOIN US
मराठी बातम्या / मनी / Share Market : 'या' सरकारी कंपनीत 40 टक्के वाढीची शक्यता; तुमच्याकडे आहे का शेअर?

Share Market : 'या' सरकारी कंपनीत 40 टक्के वाढीची शक्यता; तुमच्याकडे आहे का शेअर?

कोल इंडिया लिमिटेडने डिसेंबर 2021 मध्ये त्यांच्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 9 रुपये लाभांश दिला आहे. अशा प्रकारे, कंपनीच्या भागधारकांना या वर्षात प्रति शेअर 14 रुपये एकूण लाभांश मिळेल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 फेब्रुवारी : कोल इंडिया लिमिटेडच्या (Coal India Ltd) तिसऱ्या तिमाहीतील (Coal India Q3 Result) उत्कृष्ट निकालांमुळे बाजार विश्लेषक या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीबाबत बुलिश आहेत. कोल इंडिया बोर्डाने 2021-22 या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर 5 रुपये दुसरा अंतरिम लाभांश (Second Interim Dividend) देण्यास मान्यता दिल्यानंतर, आता ब्रोकरेज फर्म कंपनीच्या शेअर्समध्ये 40 टक्क्यांनी वाढ होण्याची अपेक्षा करत आहे. गुंतवणूकदारांना ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीज आणि मोतीलाल ओसवालने कोल इंडियाचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. कोल इंडिया लिमिटेडने डिसेंबर 2021 मध्ये त्यांच्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 9 रुपये लाभांश दिला आहे. अशा प्रकारे, कंपनीच्या भागधारकांना या वर्षात प्रति शेअर 14 रुपये एकूण लाभांश मिळेल. आयसीआयसीआय सिक्युरिटीजचा विश्वास आहे की प्रति शेअर 4 रुपये किमान लाभांश आणि लाभांश देखील वितरित केला जाऊ शकतो. Real Estate : नवीन घर खरेदी करणं महागलं, तुमच्या शहरात किती टक्के जास्त भरावे लागणार? स्टॉकमध्ये 40 टक्के वाढ होऊ शकते ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने कोल इंडियाचे बाय रेटिंग कायम ठेवले आहे. ब्रोकरेज फर्मने आपली टार्गेट प्राईज 234 रुपये दिली आहे. कंपनीच्या शेअर्सच्या सध्याच्या किमतीपेक्षा ही किंमत 40 टक्क्यांहून अधिक आहे. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की देशातील कोळशावर आधारित ऊर्जा प्रकल्पांमध्ये कोळशाचा वाढता वापर आणि वाढत्या आंतरराष्ट्रीय कोळशाच्या किमतीमुळे कोल इंडिया आर्थिक वर्ष 2022 च्या चौथ्या तिमाहीतही चांगली वाढ करेल अशी अपेक्षा आहे. मात्र वाढत्या किमतींमुळे कंपनीवर दबाव कायम राहील, पण कोळशाच्या वाढत्या किमतीमुळे खर्च वाढीवर नियंत्रण येईल. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने कोल इंडियाचे बाय रेटिंग देखील कायम ठेवले आहे. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की कोल इंडिया भारताच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यास पूर्णपणे सक्षम आहे. आता त्याचे अनेक प्रकल्प विकासाच्या टप्प्यात आहेत. येत्या दोन-तीन वर्षांत ते रिटर्न देऊ लागतील. मोतीलाल ओसवाल यांनी कोल इंडियाच्या शेअरला बाय रेटिंग देताना त्याची टार्गेट प्राईज (Coal India Share Target Price) प्रति शेअर 217 रुपये दिली आहे. सोन्याला पुन्हा झळाळी; एक वर्षानंतर दर पुन्हा 50 हजार पार, महाग होण्यामागे आहेत ही दोन मोठी कारणं कोल इंडियाचे तिमाही निकाल कोल इंडिया लिमिटेडचा डिसेंबर 2021 तिमाहीत 4,556 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा झाला आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत कंपनीच्या नफ्यात 48 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऑक्टोबर-डिसेंबर 2021 मध्ये कंपनीची विक्री 20 टक्क्यांनी वाढून 25,991 कोटी झाली. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीची विक्री 21,708 कोटी रुपये होती. तिसर्‍या तिमाहीत कोल इंडिया लिमिटेडच्या कामकाजातील महसूल 20 टक्क्यांनी वाढून 28,433 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील वर्षी याच कालावधीत ते 23,686 कोटी रुपये होते. (Disclaimer:बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन असते. गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा. News18Lokmat.com कोणालाही गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या