JOIN US
मराठी बातम्या / मनी / ICICI बँक ग्राहकांना झटका, व्याजदर वाढल्याने EMI चा बोजा वाढणार

ICICI बँक ग्राहकांना झटका, व्याजदर वाढल्याने EMI चा बोजा वाढणार

गेल्या महिन्यात 8 जून रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो दरात 50 बेसिस पाँईंट्सची वाढ जाहीर केली होती. आरबीआयच्या या घोषणेनंतर रेपो रेट 0.50 टक्क्यांनी वाढला आणि तो 4.40 टक्क्यांवरून 4.90 टक्के झाला.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 जुलै : खाजगी क्षेत्रातील ICICI बँकेने MCLR (Marginal cost of fund based lending rate) नवीन वाढ जाहीर केली आहे. आयसीआयसीआय बँकेने (ICICI Bank) MCLR मध्ये 20 बेस पॉईंट्स म्हणजेच 0.20 टक्के वाढ केली आहे. ICICI बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरून मिळालेल्या माहितीनुसार, कर्जाचे नवीन व्याजदर 1 जुलै 2022 पासून लागू करण्यात आले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank Of India) रेपो दरात (Repo Rate) वाढ केल्यानंतर देशभरातील सर्व बँका ग्राहकांना दिलेल्या कर्जाच्या व्याजदरात वाढ करत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खांद्यावर पडणाऱ्या EMI चा बोजाही वाढत आहे. वर्षाचा MCLR व्याजदर 7.55 वरून 7.75 टक्के ICICI बँकेच्या वेबसाइटवर अपलोड केलेल्या नवीन व्याजदरांनुसार, आता एका रात्रीच्या MCLR चे व्याजदर 7.30 ते 7.50 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. एक महिन्याच्या कालावधीसाठी MCLR चे व्याजदर देखील 7.30 वरून 7.50 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. 3 महिन्यांच्या कालावधीसह MCLR चे व्याजदर 7.35 वरून 7.55 टक्के करण्यात आले आहेत. याशिवाय 6 महिन्यांच्या MCLR चे व्याजदर 7.50 टक्क्यांवरून 7.70 टक्के झाले आहेत. त्याच वेळी, 1 वर्षाच्या MCLR चे व्याजदर आता 7.55 टक्क्यांवरून 7.75 टक्के झाले आहेत. आजपासून अनेक नवीन आर्थिक बदल लागू; तुमच्या खिशावर कसा परिणाम होईल? RBI कडून 8 जून रोजी रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ गेल्या महिन्यात 8 जून रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो दरात 50 बेसिस पाँईंट्सची वाढ जाहीर केली होती. आरबीआयच्या या घोषणेनंतर रेपो रेट 0.50 टक्क्यांनी वाढला आणि तो 4.40 टक्क्यांवरून 4.90 टक्के झाला. यापूर्वी, रिझर्व्ह बँकेने 4 मे 2022 रोजीच रेपो दरात 0.40 टक्क्यांनी वाढ केली होती. त्यानंतर रेपो दर 4 टक्क्यांवरून 4.40 टक्के करण्यात आला. रिझर्व्ह बँक ज्या व्याजदराने बँकांना पैसे देते, त्या व्याजदराला रेपो रेट म्हणतात. केंद्र सरकारने सोन्यावरील आयात शुल्क 5 टक्क्यांनी वाढवलं, सोन्याच्या किमतीवर काय परिणाम होणार? रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर देशभरातील सर्व बँकांनी कर्जे महाग केली. याशिवाय बँकांनी रिझर्व्ह बँकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी ठेवींवरील व्याजदरातही वाढ केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या