चंदा कोचर यांना दिलासा नाहीच
मुंबई: आयसीआयसीआय बँक आर्थिक कर्ज घोटाळा प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. ICICI बँक माजी MD चंदा कोचर, माजी CEO दीपक कोचर आणि व्हिडिओकॉनचे वेणूगोपाल धूत यांना आज विशेष CBI कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टानं दिलेली 2 दिवसांची CBI कोठडी आज संपल्यानं केलं हजर. कोचर दाम्पत्य यांना आज चौथ्यांदा तर वेणूगोपाल धूत यांना तिसऱ्यांदा हजर केलं होतं. यावेळी त्यांना पुन्हा एकदा न्यायालयाने दणका दिला आहे. न्यायालयाने न्यू ईयरआधी तिघांनाही कोणताही दिलासा दिला नाही. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 2009 ते 2011 दरम्यान, आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉनला नियम धाब्यावर बसवून कर्ज दिलं होतं. हे कर्ज देणाऱ्या समितीमध्ये चंदा कोचर यांचाही समावेश होता.
यापूर्वी ईडीने 3000 कोटींच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. या आरोपांनंतर त्यांना 2018 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या कर्जाच्या बदल्यात व्हिडिओकॉनच्या प्रवर्तकांनी चंदा कोचर यांच्या पतीला कोट्यवधी रुपये दिल्याचा सीबीआयचा आरोप आहे.