JOIN US
मराठी बातम्या / मनी / ICICI Bank ने वाढवले FD व्याजदर, नवे दर आजपासून लागू

ICICI Bank ने वाढवले FD व्याजदर, नवे दर आजपासून लागू

आयसीआयसीआय बँकेने (ICICI Bank) मुदत ठेवींवरील अर्थात फिक्स्ड डिपॉजिटवरील व्याज दरात 5 ते 10 आधार अंकांची वाढ केली (Fixed Deposit Interest Rate) आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 23 मार्च : आयसीआयसीआय बँकेत बँक अकाउंट असणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. या बँकेत FD वरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. आयसीआयसीआय बँकेने (ICICI Bank) मुदत ठेवींवरील अर्थात फिक्स्ड डिपॉजिटवरील व्याज दरात 5 ते 10 आधार अंकांची वाढ केली (Fixed Deposit Interest Rate) आहे. 2 कोटी ते 5 कोटी रुपयांवरच्या फिक्स्ड डिपॉजिटवर ही व्याजदर वाढ करण्यात आली आहे. हे नवे दर आजपासून लागू झाले आहेत. हे व्याजदर 1 वर्षापासून ते दोन वर्षापर्यंतच्या FD वर वाढवण्यात आले आहेत. आजपासून ICICI बँकेत सामान्य आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी FD व्याजदरावर 4.15 टक्के व्याजदर मिळतो आहे. हे व्याज 1 वर्ष ते 389 दिवसांच्या FD वर मिळेल. 15 महिन्यांपेक्षा कमी कालावधीवरील व्याज 4.15 टक्के असेल. याआधी व्याजदर 4.5 टक्के होता. 15 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर बँक मागील 4.10 टक्क्यांच्या तुलनेत आता 4.20 टक्के व्याजदर देत आहे. या व्याजदरात 10 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्यात आली आहे.

हे वाचा -  सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री! घरगुती गॅससह ‘या’ वस्तूंच्या किमतींचा उडाला भडका

18 महिने ते 2 वर्ष कालावधी - बँकेने व्याजदर 5 बेस पॉइंट्सने वाढवून 4.30 टक्के केला आहे. हे व्याज 18 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी आणि 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर आहे. याआधी हा दर 4.25 टक्के इतका होता.

हे वाचा -  कोरोना काळातही पुण्यातील सिल्क साड्यांच्या या स्टार्टअपची भरभराट! महिला उद्योजकाने कशी साधली किमया

या व्याजदरात बदल नाही - बँकेने 2 वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या एफडीवरील व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. ICICI बँक 3 वर्ष 1 दिवस ते 5 वर्ष आणि 5 वर्ष 1 दिवस ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर 4.6 टक्के व्याजदर आहे. तसंच 271 दिवसांपासून ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 3.70 टक्के व्याज दिलं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या