JOIN US
मराठी बातम्या / मनी / कोरोनाचा शेअर मार्केटवर परिणाम, SIP बंद करावी का?

कोरोनाचा शेअर मार्केटवर परिणाम, SIP बंद करावी का?

वाढत्या कोरोनाचा शेअर मार्केटवर कसा होणार परिणाम? SIP बंद करावी का तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथे मिळणार

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : जगभरात पुन्हा एकदा कोरोना नं डोकं वर काढलं आहे. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर आणि शेअर मार्केट वर होताना दिसत आहे. परिणामी भारतावर त्याचा कसा परिणाम होतो याकडे सध्य़ा सर्वांचं लक्ष लागलं आहे. निलेश शाह (एम डी, सीईओ कोटक एएमसी) यांनी महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. कोरोना हा सध्या चिंतेचा विषय आहे. मागच्या दोन वर्षात पाहिलं तर एका लॅबमधून बाहेर आला. त्याची किंमत भारतासह जगभरातील देशांना मोजावी लागली. आपल्याला अजूनही म्हणावी तेवढी या व्हायरची माहिती अजूनही मिळत नाही. चीन मोठ्या प्रमाणात उत्पादन करणारा देश आहे. इथे कोरोनामुळे जर उत्पादन थांबलं तर सप्लाय चेन आणि कमोडिटीवर त्याचा मोठा आणि गंभीर परिणाम दिसून येईल असं निलेश शाह यांनी सांगितलं. CNBC आवाजने दिलेल्या वृत्तानुसार जगभरात कोरोनामुळे चिंता पसरली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे शेअर मार्केटवरही त्याचे परिणाम दिसू शकतात. सध्याची मार्केट स्थिती पाहता भारताची स्थिती इतर देशांपेक्षा चांगली आहे. इतर देशांचं व्हॅल्युएशन खूप जास्त कोसळलं आहे. त्या तुलनेत भारतातील शेअर बाजाराची स्थिती बऱ्यापैकी चांगली म्हणावी लागेल.

Jalgaon Gold Rate : जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याचे भाव 56 हजार पार

अस्थिरता आणि मंदीच्या भीतीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठे कोसळली आहे. पश्चिम बाजारपेठांमध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कॉर्पोरेट अर्निंगमध्ये ग्रोथ दाखवत राहिलो तर त्याचा फायदा आपल्याला होणार आहे. मंदीचं सावट असतानाही आपलं मार्केट चांगलं करू शकतं अशी आशा निलेश शाह यांना आहे. मंदी जरी आली तरी त्याचा खूप मोठा फटका आंतरराष्ट्रीय बाजारपेठेला बसेल याची शक्यता कमी आहे. लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत, त्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत असंही निलेश शाह म्हणाले. मार्केटमधील प्रत्येक सेक्टर महत्त्वाचा आहे. त्यामुळे सगळ्यांनी एकसाथ डिलिव्हर करणं आवश्यक आहे. SIP मध्ये गुंतवणूक करणं सुरू ठेवायला हवं. शेअर मार्केट खाली आलं तर गुंतवणूक वाढवण्याकडे कल हवा. रियल स्टेटशी संबंधित ज्या कंपन्या कच्चा माल पुरवतात त्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करा.

1 जानेवारीपासून बदलणार लॉकरचे नियम, तुम्ही तर घेतलं नाही ना?

संबंधित बातम्या

इंफ्रा सेक्टरमध्ये सरकार आणि प्रायव्हेट दोन्हीकडून गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे आता सिमेंट, टाइल्स, सळ्या, लोखंड या सगळ्या कंपन्यांच्या उत्पादनांची मागणी वाढत आहे. त्यामुळे या कंपन्यांकडे गुंतवणुकीचा कल ठेवणं योग्य राहील असं मत निलेश शाह यांनी व्यक्त केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या