पब्लिक प्रोव्हिडेंट फंड
मुंबई, 26 जानेवारी: पब्लिक प्रोविडेंट फंड ही देशातील प्रसिद्ध स्मॉल सेविंग स्किम्समधून एक आहे. सामान्य भाषेत आपण त्याला PPF म्हणतो. यामध्ये गुंतवणूकीची रक्कम पूर्णपणे सुरक्षित राहते. या सरकारी योजनेत तुम्ही वार्षिक किमान 500 रुपये गुंतवू शकता आणि तर जास्तीत जास्त मर्यादा 1.5 लाख रुपयांपर्यंत आहे. सध्या सरकार पीपीएफवर वार्षिक 7.1 टक्के दराने व्याज देत आहे.
गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याज उपलब्ध आहे. ज्याची गणना वार्षिक आधारावर केली जाते. पोस्ट ऑफिससह देशातील जवळपास सर्व सरकारी आणि खाजगी बँकांमध्ये तुम्ही पीपीएफ खाते उघडू शकता. यासाठी भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. अल्पवयीन मुलांच्या नावाने पीपीएफ खाते उघडता येते. मात्र यासाठी पालक असणे आवश्यक आहे. मुलाच्या खात्यातील कमाई पालकांच्या मिळकतीसह एकत्रित केली जाते.
बचतीसाठी पोस्ट ऑफिसची ही स्किम आहे बेस्ट, 95 रुपयांच्या बचतीने मिळतील 14 लाख!PPF चा लॉकिंग कालावधी 15 वर्षांचा असतो. त्यामुळे तुम्हाला दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करायची असेल, तर पीपीएफ हा उत्तम पर्याय आहे. जर तुम्हाला या दरम्यान पैशांची गरज असेल तर या योजनेत आंशिक पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. जर तुम्हाला 15 वर्षापूर्वी पैसे काढायचे असतील तर सात वर्षांनंतरच पैसे काढण्याची परवानगी आहे. या योजनेत गुंतवणूक करताना, हे देखील लक्षात ठेवा की पीपीएफ अकाउंटच्या मॅच्योरिटीमध्ये 15 वर्षांच्या गणनेत गुंतवणूक सुरू करण्याचे वर्ष काउंट केले जात नाही.
1 एप्रिलनंतर बदलणार NPS चे नियम, अवश्य घ्या जाणून; अन्यथा अडकतील पैसेसात वर्षांनंतर तुम्ही पीपीएफ खात्यातून आंशिक पैसे काढू शकता. तुम्ही खात्यातून 50 टक्के रक्कम काढू शकता. पण तुम्ही वर्षातून एकदाच पैसे काढू शकता. काढलेली रक्कम इन्कम टॅक्सच्या कराच्या कक्षेत येईल.
पीपीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी तुम्हाला फॉर्म सी सबमिट करावा लागेल. हे बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला मिळेल. फॉर्ममध्ये, तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर आणि तुम्हाला काढायची असलेली रक्कम नमूद करावी लागेल. याशिवाय रेव्हेन्यू स्टॅम्पही लागणार आहे. त्यानंतर पासबुकसह जमा करावे लागेल. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, रक्कम तुमच्या खात्यात ट्रान्सफर केली जाईल.
पीपीएफ खाते तीन वर्षे चालवल्यानंतर तुम्ही त्यावर कर्ज घेऊ शकता. खाते उघडण्याच्या तिसऱ्या वर्षापासून ते सहाव्या वर्षापर्यंत कर्जाची सुविधा उपलब्ध आहे. तसंच पहिले कर्ज बंद झाल्यानंतरच दुसरे कर्ज अप्लाय केले जाऊ शकते. पीपीएफ खात्यावर जमा केलेल्या रकमेपैकी केवळ 25 टक्के रक्कम कर्ज म्हणून घेता येते. पीपीएफमध्ये पैसे जमा करून, चांगल्या रिटर्नसह, तुम्ही इन्कम टॅक्स सूटचा लाभ देखील घेऊ शकता. तुम्ही आयकर कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ घेऊ शकता, ज्याची कमाल मर्यादा रु. 1.5 लाख आहे.