JOIN US
मराठी बातम्या / मनी / लॉगिन पासवर्ड विसरल्यामुळं Income Tax Return भरता येईना? आधारच्या मदतीने असा करा रिसेट

लॉगिन पासवर्ड विसरल्यामुळं Income Tax Return भरता येईना? आधारच्या मदतीने असा करा रिसेट

Income Tax Return : आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख जवळ येत आहे. आयकर विभागाच्या मते, 31 जुलै 2022 ही ITR दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.

जाहिरात

लॉगिन पासवर्ड विसरल्यामुळं Income Tax Return भरता येईना? आधारच्या मदतीने असा करा रिसेट

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 जुलै : आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख जवळ येत आहे. आयकर विभागाच्या मते, 31 जुलै 2022 ही आयकर रिटर्न दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही लॉगिन किंवा पासवर्ड विसरल्यामुळे इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करू शकत नसाल, तर येथे तुम्ही आधार ओटीपीच्या मदतीने सहजपणे आयटीआर फाइल करू शकता. आधारच्या मदतीने तुम्ही लॉगिन पासवर्ड कसा रिसेट (Reset Password of ITR using Aadhaar) करू शकता हे आज आपण जाणून घेऊया. आयकर वेबसाइटनुसार, ई-फायलिंग पोर्टलचा वापर करून आयकर रिटर्न भरणाऱ्या सर्व करदात्यांना पासवर्ड आणि लॉगिन आवश्यक आहे. परंतु, जर तुम्ही तुमचा पासवर्ड विसरला असाल, तर तुमच्यासाठी रिसेट पर्याय उपलब्ध आहे. आयकर वेबसाइटनुसार, “विसरलेला पासवर्ड ई-फायलिंग पोर्टलवर सर्व नोंदणीकृत वापरकर्ते रिसेट करू शकतात. तुम्ही ई-फायलिंग पोर्टलवर अनेक पर्यायांद्वारे पासवर्ड रिसेट करू शकता. यामध्ये ई-फायलिंग ओटीपी आणि आधार ओटीपी, बँक खाते ईव्हीसी, डीमॅट खाते ईव्हीसी, डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र (डीएससी) आणि नेट बँकिंगसह रिसेट करू शकता. हेही वाचा:  Indigo Airline प्रवाशांकडून आकारत आहे ‘क्यूट चार्ज’; काय आहे याचा अर्थ? आधार OTP सह पासवर्ड कसा रिसेट करायचा? तुम्हाला आधार OTP वापरून ITR फाइल करण्यासाठी पासवर्ड रिसेट करायचा असल्यास, अगदी सोप्या स्टेप्सद्वार ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. पण यासाठी तुमचा आधार पॅनकार्डशी लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या