JOIN US
मराठी बातम्या / मनी / सायबर क्राइम रिपोर्ट करण्यासाठी काय करावं? हेल्पलाइन नंबर कोणता?

सायबर क्राइम रिपोर्ट करण्यासाठी काय करावं? हेल्पलाइन नंबर कोणता?

ऑनलाइन फसवणूक किंवा सायबर क्राइमचे प्रकरण समोर आल्यास, त्याची तक्रार करण्यासाठी सोशल मीडियावरील फॉरवर्ड मेसेजवर अवलंबून न राहता, गृह मंत्रालयाने जारी केलेल्या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करा.

जाहिरात

सायबर क्राइम

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 27 मे : सध्या सायबर फ्रॉड आणि फसवणुकीशी संबंधित अनेक प्रकरणे समोर येतात. यामध्ये लोकांना वेगवेगळ्या प्रकारे टार्गेट करून त्यांच्या बँक अकाउंटमधून पैसे गायब केले जातात. पण कधी कधी याशी संबंधित अफवाही आपल्याला ऐकायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये पोलिसांच्या गणवेशातील एक व्यक्ती सायबर फसवणुकीची तक्रार करण्यासाठी नंबर देत आहे. त्याच्या सत्यतेविषयी अनेक लोकांना भ्रम आहे.

PIB Fact Check ने पुष्टी करत सांगितले की, व्हिडिओमध्ये पोलीस अधिकाऱ्याने दिलेला नंबर बरोबर आहे, परंतु हा व्हिडिओ खूप जुना आहे, कारण हा नंबर आता बदलला आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेला नंबर ‘155260’ आहे जो आता टोल फ्री हेल्पलाइन नंबर ‘1930’ असा झालाय.

RBI कडे पोहोचल्यावर 2,000 च्या नोटांचं काय होणार? जाळणार की फाडणार?

सायबर क्राइमची तक्रार कुठे करायची

पीआयबीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटनुसार, गृह मंत्रालयाने सायबर गुन्ह्यांची तक्रार करण्यासाठी त्वरित सेवा “155260” सुरू केली होती. जी आता बदलली आहे. हा एक टोल फ्री नंबर आहे ज्यावर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या सायबर क्राईमची तक्रार करू शकता. cybercrime.gov.in वर देखील सायबर क्राइमशी संबंधित तक्रार नोंदवता येईल असे ट्विटमध्ये सांगण्यात आलेय.

हेल्पलाइनवर किती तक्रारी नोंदवण्यात आल्या?

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) ने दिलेल्या आकडेवारीनुसार, 30 ऑगस्ट 2019 ते 30 मार्च 2022 पर्यंत या हेल्पलाइनवर आर्थिक फसवणुकीच्या एकूण 175494 तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. या तक्रारींवर संबंधित राज्यांच्या कायदा अंमलबजावणी संस्था कारवाई करत आहेत.

5 वर्षांची FD एक वर्षात मोडली तर काय? पैसे कमी मिळतात का?

असा करा स्वतःचा बचाव

सायबर क्राइमपासून सुरक्षित राहण्यासाठी, आपण नेहमी सतर्क आणि सावध असणे आवश्यक आहे. एसएमएस आणि ईमेलवर प्राप्त झालेल्या कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नका. तुमच्या बँक अकाउंटशी संबंधित गोपनीय माहिती कोणासोबतही शेअर करू नका. कोणत्याही संशयास्पद कॉल, मॅसेज किंवा मेलला उत्तर देऊ नका आणि त्यांना ब्लॉक करा. अशा प्रकारे तुम्ही सायबर फसवणुकीचा धोका कमी करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या