मुंबई : कोणत्याही बँकेत तुमचं खातं आहे. एकापेक्षा जास्त खातं आहे मात्र तुम्ही सुरू ठेवलं नाही तर अशावेळी तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही जर एका वर्षात सेव्हिंग किंवा करंट अकाउंट वापरलं नाही तर ते डिअॅक्टिव्ह होऊ शकतं. याबाबत तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. 2 वर्षांपर्यंत जर तुमचं खातं इनअॅक्टिव्ह राहिलं तर ते निगेटिव्हमध्ये जातं आणि त्यावर चार्ज लागतात. ते खातं इनऑपरेटिव्ह अकाउंडमध्ये जातं. ग्राहक या खात्याचा वापर करू शकत नाहीत. तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्यासोबतही असा प्रकार घडू नये तर काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. बऱ्याचदा एकापेक्षा जास्त खाती काही ग्राहक ठेवातात. त्यामुळे ती मेंटेन ठेवणं देखील कठीण होऊन जातं. जर तुम्ही ते चांगल्या पद्धतीने ते मॅनेज करू शकला नाहीत तर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जर पैसे ठेवता आला नाही तर खातं बंद होऊ शकतं. जेव्हा ते खातं सुरू कराल तेव्हा तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. तुम्ही निगेटिव्ह रक्कम भरून फॉर्म भरून पुन्हा तुम्हाला सुरू करता येईल.
कोणत्याही बँकेत खातं असेल तर 2 लाखांपर्यंत होणार फायदा, बस्स करा ‘हे’ कामकाय असतं डॉरमेंट खातं? इनअक्टिव्ह खात्याला डॉरमेंट खातं म्हणतात. जेव्हा ग्राहक खात्यावरून कोणतंही ट्रान्झाक्शन करत नाही. डेबिट किंवा क्रेडिट करत नाही तेव्हा हे खातं बंद होतं. तुम्ही जर दोन वर्षांत हे खातं पुन्हा सुरू केलं नाही तर ते बंद होतं थोडक्यात इनअॅक्टिव्ह होतं. त्यासाठी तुम्हाला पुन्हा बँकेत एक फॉर्म भरून पेनल्टी भरावी लागेल. त्यानंतर तो तुमच्या खात्यावर ट्रान्झाक्शन करावं लागेल. का बंद होतं खातं? तीन महिने किंवा एक वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी जर तुम्ही खातं वापरलं नाही तर ते इनअॅक्टीव्ह गृहित धरलं जातं. बँक कर्मचारी अशा खात्याचा गैरवापरही करण्याचा धोका असतो. दुसरा धोका फसवणूक करणारे लोक या खात्यावर डोळा ठेवून असतात. खातं बंद झाल्यासाठी तुम्हाला चेकबुक मिळणार नाही.
Savings Day : ‘जागतिक बचत दिन’ का साजरा करतात, याची सुरुवात कशी झाली?तुम्ही किती Saving Account उघडू शकता, RBI चा नियम काय सांगतो?तुम्ही खात्याचा पत्ता बदलू शकत नाही. सहीमध्ये बदल करू शकत नाही, जाईंट अकाऊंट असेल तर दुसऱ्या मेंबरला हटवता येत नाही. एटीएममधून पैसे काढता येत नाही. एवढं नाही तर ते रिन्यू देखील करता येत नाही. इंटरनेट बँकिंगचा वापर तुम्ही करू शकत नाही. तुमचं खातं फ्रीज होऊ शकतं त्यामुळे खातं बंद होणार नाही याची काळजी घ्या.