मुंबई, 3 एप्रिल : ऑनलाईन जगात सध्या बहुतेक गोष्टी डिजिटल होत आहेत. वीज बिल असो वा मोबाईल रिचार्ज यासाठी आता कुठे रांगेत उभं रहावं लागत नाही किंवा दुकानात जावं लागत नाही. आता तुम्हाला LIC चा प्रीमियम भरण्यासाठी ऑफिसमध्ये जाण्याची किंवा एंजटकडे पैसे जमा करण्याची गरज नाही. तुम्ही हे ऑनलाइन सहज करू शकता. भारतीय आयुर्विमा महामंडळाने त्यांच्या पॉलिसीधारकांना प्रीमियम (LIC Premium) भरण्यासाठी काही ऑनलाइन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. एलआयसी वेबसाइट व्यतिरिक्त, अशी अनेक पेमेंट अॅप्स (Payments App) आहेत जी तुम्हाला एलआयसी प्रीमियम जमा करण्यात मदत करतात. तुम्ही तुमच्या घरी बसून पॉलिसी प्रीमियम ऑनलाइन भरू शकता. तुम्हाला थेट LIC वेबसाइटवरून प्रीमियम जमा करायचा असेल तर काही सोप्या स्टेप्स फॉलो करा. सनी लिओनीसह राजकुमार रावसोबत पॅन कार्ड फ्रॉड; तुमच्या PAN Card चा चुकीचा वापर होत नाही ना? असं तपासा » तुम्हाला प्रथम www.licindia.in वर जावे लागेल. » यानंतर, तुम्हाला येथे ‘Pay Direct’ लिहिलेले दिसेल जेथे तुम्ही लॉगिन न करताही प्रीमियम भरू शकता. » येथे दुसरे पेज उघडेल जिथे ‘Please Select’, ‘Premium Payment’ असे लिहिलेले असेल, तुम्हाला त्यावर क्लिक करावे लागेल आणि Next बटण दाबावे लागेल. » अशा प्रकारे रजिस्टर यूजर्स प्रीमियम भरतात. याशिवाय नोंदणीकृत यूजर्सना प्रथम एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. येथे ग्राहक पोर्टलद्वारे क्लिक करून प्रीमियमशी संबंधित माहिती विचारली जाईल. तपशील भरल्यानंतर तुम्हाला साइन इन करावे लागेल. पुढील पेजवर, Self/policies या पर्यायावर क्लिक करा. येथे तुम्हाला LIC Renew ची तारीख दिसेल. पेमेंट प्रलंबित असल्यास, नूतनीकरणाची तारीख दर्शविली जाईल. यानंतर, तुम्ही Pay Premium चा पर्याय निवडून तुमची पॉलिसी सबमिट करू शकता. नववर्षात Cibil Score चांगला ठेवण्याचा संकल्प करा आणि स्वत:चं क्रेडिट वाढवा, या स्टेप्स करा फॉलो LIC प्रीमियम अॅप्सद्वारे कसा भरणार? याशिवाय अनेक UPI पेमेंट अॅप्स आहेत जिथे LIC प्रीमियम भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. येथून ग्राहक सहजपणे प्रीमियम भरू शकतात. PhonePe, Paytm, Google Pay इत्यादी पेमेंट अॅप्सला भेट देऊन LIC प्रीमियम भरला जाऊ शकतो. स्टेटस तपासा » तुमच्या पॉलिसीची स्थिती जाणून घेण्यासाठी, LIC च्या अधिकृत वेबसाइट https://www.licindia.in/ ला भेट द्या. » येथे तुम्हाला प्रथम स्वतःची नोंदणी करावी लागेल. » नोंदणी करण्यासाठी, https://ebiz.licindia.in/D2CPM/#Register या वेबसाइटला भेट द्या. » येथे तुम्ही तुमचे नाव, पॉलिसी क्रमांक आणि जन्मतारीख टाका. » एकदा नोंदणी पूर्ण झाल्यावर, तुम्ही तुमचे एलआयसी खाते कधीही उघडून स्थिती तपासू शकता.