JOIN US
मराठी बातम्या / मनी / Auto Tips: गाडी चालवताना 'हे' नियम पाळा, पेट्रोल-डिझेलवर होणारा हजारोंचा खर्च वाचवा

Auto Tips: गाडी चालवताना 'हे' नियम पाळा, पेट्रोल-डिझेलवर होणारा हजारोंचा खर्च वाचवा

गाडीच्या टायरमध्ये नेहमी योग्य प्रेशर राखला पाहिजे. कारण टायरमध्ये कमी हवा ठेवल्याचा थेट परिणाम गाडीच्या मायलेजवर होतो, तर जास्त हवा ठेवल्यास टायर फुटण्याचा धोका असतो.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 जून : पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel) वाढत्या किमती कार मालकांची डोकेदुखी वाढवत आहेत. यासाठी गाडीचा मायलेज (Car Mileage) चांगला असणे सर्वात महत्वाचे आहे. गाडी जुनी असेल तर गाडीचा मायलेजही कमी होतो. जर तुम्ही तुमच्या कारच्या कमी मायलेजमुळे त्रस्त असाल आणि मेकॅनिककडून अनेकदा दुरुस्ती करूनही तुम्हाला चांगले मायलेज मिळत नसेल, तर काय करायंच? आज काही टिप्स (Auto Tips) सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही सहजपणे कारचा मायलेज वाढवू शकता, जेणेकरुन तुमचे पैसे वाचतील. योग्य वेळी क्लच वापरा गाडी चालवताना क्लचचा अनावश्यक वापर टाळावा. क्लचचा अधिक वापर केल्याने जास्त इंधन लागते. जिथे क्लचची गरज नाही तिथे अजिबात वापरू नका. नवीन ड्रायव्हर्स अनेकदा क्लचवर अधिक जोर देतात. यामुळे तुमची क्लच प्लेट देखील खराब होऊ शकते. यासाठी योग्य गीअर्स वापरा आणि गरज असेल तेव्हाच क्लच वापरा. टायरचा प्रेशर तपासत राहा गाडीच्या टायरमध्ये नेहमी योग्य प्रेशर राखला पाहिजे. कारण टायरमध्ये कमी हवा ठेवल्याचा थेट परिणाम गाडीच्या मायलेजवर होतो, तर जास्त हवा ठेवल्यास टायर फुटण्याचा धोका असतो. म्हणूनच हवेचा प्रेशर वेळोवेळी तपासणे महत्त्वाचे आहे. जर तुमच्याकडे बजेट असेल, तर तुम्ही कारच्या टायर्समध्ये एअर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम देखील बसवू शकता. हे खूप सोयीचे आहे. Multibagger Share: 11 रुपयांचा शेअर खरेदी करुन कमावले लाखो रुपये; तुमच्याकडे आहे का? गती मेंटेन ठेवा कार चालवताना, कारचा वेग नेहमी खूप कमी किंवा जास्त ठेवू नये, कारण कारचा मायलेज कमाल वेगावर अवलंबून असते. जर तुम्ही योग्य वेगाने कार चालवली तर तुम्हाला उत्तम मायलेज मिळेल. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कारचा वेग 80 किमी प्रतितास ते 100 किमी प्रतितास दरम्यान असेल तर कार हायवेवर चांगले मायलेज देते. वेळेवर सर्व्हिसिंग करा कारची चांगली देखभाल आणि नियमित सर्व्हिसिंग यामुळे तिचे मायलेज वाढण्यास मदत होते. इंजिन आणि गिअरबॉक्स सारख्या वाहनांच्या हलत्या भागांना लुब्रिकेशन आवश्यक आहे. वेळेत हे न केल्यास मायलेज कमी होते. म्हणूनच गाडी नवीन आहे की जुनी, त्याची वेळोवेळी सर्व्हिसिंग करणे आवश्यक असते. वर्षातून एकदा तरी किंवा 10 हजार किलोमीटर चालल्यानंतर सर्विसिंग करा. मालमत्ता 99 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर का दिली जाते? मग मालकी कुणाकडे राहते? ट्रॅफिक अलर्ट कुठेही जाण्यापूर्वी कारमधील ट्रॅफिक अलर्ट फीचर (Traffic Alert Feature) एकदा वापरा. यामुळे तुम्हाला कळेल की तुम्ही जिथे जात आहात त्या मार्गावर जास्त ट्रॅफिक आहे की नाही. आजकाल, रेडिओ स्टेशन आणि स्मार्ट फोनवर ट्रॅफिक अलर्ट येत राहतात, ज्यामध्ये जास्त ट्रॅफिक कुठे आहे ते सांगितले जाते. त्यानुसार मार्गाचे नियोजन केल्यास इंधनाची बचत होऊ शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या