चुकीच्या अकाउंटवर गेलेले पैसे परत कसे मिळवायचे
नवी दिल्ली, 25 जून : ऑनलाइन बँकिंगच्या काळात आपण मिनिटांमध्ये कोणालाही पैसे ट्रान्सफर करु शकता. मात्र ही सुविधा जेवढी सोपी आहे. त्यामध्ये तेवढीच रिस्क आहे. कारण अनेकदा आपण घाईघाईत चुकीच्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करतो. एका चुकीमुळे पैसा चुकीच्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये पोहोचू शकतो. तुमच्याकडूनही कधी अशी चूक झाली तर काय करता येऊ शकतं? आपला पैसा परत मिळवण्यासाठी कोणती पाऊलं उचलावी लागतील? स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका ग्राहकाने नुकताच अशाच समस्येचा सामना केला आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर याबद्दल तक्रार केली. त्यानंतर बँकेने त्या व्यक्तीला त्याचे पैसे कसे परत करायचे ते सांगितले. चला जाणून घेऊया पैसे ट्रान्सफर करताना चूक झाली तर काय करावे?
बँकेने स्वतः सांगितली ट्रिक रवी अग्रवाल नावाच्या ग्राहकाने ट्विटरवर पोस्ट टाकली, ‘प्रिय @TheOfficialSBI मी चुकून चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले. हेल्पलाइनने सांगितल्याप्रमाणे मी माझ्या शाखेला सर्व माहिती दिली आहे. तरीही माझी शाखा रिव्हर्सलविषयी कोणतीही माहिती देत नाहीये. कृपया मदत करा.’ या प्रश्नाच्या उत्तरात, SBI च्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर हे पैसे परत कसे मिळवायचे याविषयी सांगण्यात आलंय. Insurance : सॅलरी प्रोटेक्शन इन्शुरन्स म्हणजे काय? जाणून घ्या कठीण काळात कसा येत राहतो पैसा तक्रार कशी आणि कुठे करायची जर एखाद्या ग्राहकाने पैसे ट्रान्सफर करताना चुकीचा बँक अकाउंट नंबर टाकला असेल, तर त्याने/तिने होम ब्रँचशी संपर्क साधावा. त्यानंतर, होम ब्रांच कोणत्याही आर्थिक दायित्वाशिवाय दुसर्या बँकेकडे पाठपुरावा प्रक्रिया सुरू करेल. SBI ने म्हटले आहे की, जर शाखेत प्रकरण मिटले नाही तर ग्राहक https://crcf.sbi.co.in/ccfunder वैयक्तिक विभाग/ वैयक्तिक ग्राहक येथे तक्रार करू शकतात. याशिवाय तुम्ही NPCI पोर्टलवरही तक्रार करू शकता. RBI काय म्हणते? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गाइडलाइननुसार, ऑनलाइन पेमेंट करताना ग्राहकाच्या खात्यातील रक्कम चुकून दुसऱ्याला ट्रान्सफर झाली, तर तक्रारीची दखल घेणे आणि 48 तासांच्या आत पैसे परत करणे ही बँकेची जबाबदारी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ग्राहकाने प्रथम पेमेंट सेवा प्रदात्याकडे याची तक्रार केली पाहिजे. यासोबतच तुम्ही ज्या कोणत्याही अॅपद्वारे म्हणजे GPay, PhonePe, Paytm किंवा UPI द्वारे पैसे ट्रान्सफर केले असतील. त्यांच्या कस्टमर केयर सपोर्टमध्ये ही समस्या मांडा. Home Loan EMI: एका बँकेने स्वस्त केलं कर्ज, तर दुसरीने वाढवला इंटरेस्ट रेट; चेक करा EMI डिटेल्स तक्रारीसाठी कोणत्या नंबरवर कॉल करायचा जेव्हाही UPI आणि नेट बँकिंगद्वारे चुकीच्या अकाउंट नंबरवर पैसे जातात. तेव्हा सर्वप्रथम 18001201740 वर तक्रार नोंदवा. यानंतर संबंधित बँकेत जाऊन फॉर्म भरा आणि त्याची माहिती द्या. बँकेने मदत करण्यास नकार दिल्यास, bankingombudsman.rbi.org.in वर तक्रार करा.