JOIN US
मराठी बातम्या / मनी / नोकरी जाण्याचं टेन्शन आता विसरा, लॉकडाऊनमध्ये हे काम करून लाखो कमवा

नोकरी जाण्याचं टेन्शन आता विसरा, लॉकडाऊनमध्ये हे काम करून लाखो कमवा

आता लॉकडाऊनमध्ये काही शिथीलताही मिळाली असल्यानं हा बिझनेस सुरू केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 4 जून : कोरोना व्हायरसमुळे देशातले अनेक व्यवसाय बंद पडले आहेत. त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर रोजंदारीवर काम करणारे अनेक मजूर लॉकडाऊनमुळे आपापल्या गावी परतले आहेत. पण लॉकडाऊननंतर काही नव्या बिझनेसच्या संधी आपल्याला उपलब्ध होणार आहेत. आपण अशा बिझनेसच्या संधींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या लॉकडाऊन संपल्यावर तुमच्या कमाईचा मुख्य स्रोत ठरू शकतात. कोरोना व्हायरसचं लॉकडाऊन संपल्यावर लोकांना आपल्या बिल्डिंग गाड्या आणि इतर अनेक गोष्टी सॅनिटाइझ करायच्या असणार आहेत. आता लॉकडाऊनमध्ये काही शिथीलताही मिळाली असल्यानं हा बिझनेस सुरू केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो. सध्या अनेक ठिकाणी रस्ते, रेल्वे स्टेशन, ट्रेन, कार, ऑटो रिक्षा आणि घरांचं सॅनिटायझेशन केलं जात आहे. ज्या ठिकाणी संक्रमण होण्याच्या शक्यता आहेत त्या प्रत्येक ठिकाणी सॅनिटायझेशन केलं जात आहे. अनेक ऑफिसांमध्ये सॅनिटाझेशनचा नियमचं तयार करण्यात आला आहे. किती होणार फायदा जर तुम्ही हा व्यवसाय सुरू केलात तर सुरुवातीच्या काळातच तुम्हाला यातून बराच फायदा होऊ शकतो. दुचाकी वाहनांना सॅनिटाइझ करण्यासाठी जवळपास 15-20 मिनिटं लागतात. ज्यातून तुम्हाला 200-300 रुपये किंवा त्यातून जास्त फायदा होऊ शकतो. सामान्यांच्या खिशाला फटका! भारतात पेट्रोल-डिझेल महाग होण्याची शक्यता, वाचा कारण चार चाकी वाहनांना सॅनिटाइझ करण्यासाठी 20-25 मिनिटं लागतात. ज्यातून तुम्हाला 500 रुपये किंवा त्याहून अधिक कमाई होऊ शकते. जर दिवसभरातून तुम्ही 10 वाहनांचं सॅनिटाझेशन केलं तर तुम्हाला 5000 रुपये मिळतील. अशाप्रकारे तुमची महिन्याची कमाई 1.5 लाख रुपयांच्या आसपास जाऊ शकते. कसा सुरू कराल व्यवसाय सध्या मार्केटमध्ये अनेक ऑटोमॅटिक मशीन उपलब्ध आहेत. ज्यांच्या मदतीनं सॅनिटायझेशन करणं सोपं जाईल. त्यामुळे तुमच्य बजेटनुसार तुम्ही या मशीनची निवड करु शकता. सध्या ज्या गाड्या रस्त्यावर उतरत आहेत त्यांना सॅनिटायझेशन करणं अत्यावश्यक आहे. पण हे काम करताना तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी लागेल ती म्हणजे हे काम करताना तुम्हाला सरकारनं घालून दिलेल्या सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचं पालन करायचं आहे. लॉकडाऊनमध्ये बेरोजगारी! एप्रिलपेक्षा मे महिन्यात सर्वाधिक लोकांनी गमावली नोकरी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या