JOIN US
मराठी बातम्या / मनी / Aadhaar Card शी लिंक असलेला मोबाईल नंबर आठवत नाही? पटकन चेक करा डिटेल्स

Aadhaar Card शी लिंक असलेला मोबाईल नंबर आठवत नाही? पटकन चेक करा डिटेल्स

तुमचा कोणता मोबाईल नंबर आधारशी लिंक आहे हे देखील तुम्ही विसरला असाल तर घाबरण्याची गरज नाही. ते तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. खालील प्रोसस चेक करा.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 2 एप्रिल : आधार कार्ड (Aadhaar Card) सध्या एक अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज बनला आहे. अनेक कामं आधार कार्ड शिवाय होणे सध्या अशक्य आहे. कारण आधार कार्ड बऱ्याच ठिकाणी लिंक असल्याने तुमची माहिती काही क्षणात उपलब्ध होते. आधार कार्ड UIDAI द्वारे जारी केले जाते. आधार कार्डचा वापर करताना ते अपडेट ठेवणेही गरजेचे आहे. तुमचा फोन नंबर नंबर आधार कार्डशी लिंक असणेही खूप महत्त्वाचे आहे. आधार कार्ड बनवताना मोबाईल नंबर (Mobile Number) तुम्ही लिंक केला असेल. मात्र काही कारणास्तव तुम्ही मधल्या काळात अनेक नंतर बदलले असतील तर तुम्ही आधार कार्डमध्ये नवीन क्रमांक देखील अपडेट करू शकता. अनेकदा एखाद्या व्यक्तीकडे एकहून अधिक मोबाईल नंबर असतात. त्यांनी कोणता नंबर आधारशी लिंक केला होता हे त्यांना आठवत नाही. आधारशी लिंक केलेला मोबाईल क्रमांक लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक कामांसाठी OTP आवश्यक असतो, जो फक्त आधारशी लिंक केलेल्या मोबाईलवर येतो. त्यामुळे आधारशी लिंक मोबाईल नंबर माहिती असणे आवश्यक आहे. PAN-Aadhaar Link: पॅन-आधार कार्ड लिंक करण्यासाठी आता कोणत्या महिन्यात किती दंड भरावा लागणार? आधारशी लिंक मोबाईल नंबर कसा शोधाल? तुमचा कोणता मोबाईल नंबर आधारशी लिंक आहे हे देखील तुम्ही विसरला असाल तर घाबरण्याची गरज नाही. ते तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. » UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ ला भेट द्या. » येथे My Aadhaar सेक्शनवर क्लिक करा. » त्यानंतर Aadhaar Service पर्यायावर क्लिक करा. » Aadhaar Service मध्ये Verify an Aadhaar Number वर क्लिक करा. » तुमचा आधार क्रमांक एंटर करा. » कॅप्चा कोड योग्यरित्या भरा. » आता Proceed to Verify वर क्लिक करा. » यानंतर आधारशी लिंक केलेल्या तुमच्या मोबाईल नंबरचे शेवटचे तीन नंबर दिसतील. » जर मोबाईल नंबर लिंक केलेला नसेल तर तो इथे दिसणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या