पोस्ट ऑफिस अकाउंट बॅलेन्स कसं तपासावं
मुंबई, 20 फेब्रुवारी: बचत ही गुंतवणुकीची पहिली पायरी आहे. बचत होईल, तरच गुंतवणूक करता येईल. देशातील बचतीसाठी, सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील बँका तसेच पोस्ट ऑफिस देखील बचत खाते उघडण्याची सुविधा प्रदान करतात. ही बचत खाती ग्राहक ऑफलाइन आणि ऑनलाइन उघडू शकतात. पोस्ट ऑफिस बचत खाते ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही उघडता येते. महत्त्वाचं म्हणजे पोस्ट ऑफिस बचत खात्यात किमान 500 रुपयांची गुंतवणूक करूनही खाते उघडता येते. पोस्ट ऑफिस बचत योजना आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर बचत फायदे देखील देतात. या योजनेवर मिळणारे व्याज दरवर्षी 10,000 रुपये टॅक्स फ्री आहे. देशात अशा 7 पद्धती आहेत ज्याद्वारे तुम्ही पोस्ट ऑफिस बचत खात्यातील बॅलेन्स तपासू शकता. यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक संबंधित पोस्ट ऑफिस बचत खात्याशी जोडलेला असावा. मोबाईल नोंदणीसाठी CIF क्रमांक आणि जन्मतारीख जवळ ठेवा. चला तर मग जाणून घेऊया 7 पद्धती ज्याद्वारे तुम्ही बँक खाते ऑफलाइन आणि ऑनलाइन तपासू शकता.
2022 मध्ये सरकारने पोस्ट ऑफिस बचत खात्यासाठी ई-पासबुक सुविधा सुरू केली. ग्राहक आता बँकेला भेट न देता कोठूनही त्यांच्या अकाउंट डिटेल्स जाणून घेऊ शकतात. पोस्ट ऑफिस अकाउंट उघडा आणि बॅलन्स आणि स्टेटमेंट अंतर्गत स्टेटमेंट ऑप्शनवर क्लिक करा आणि गो बटण दाबा. यानंतर तुम्ही स्टेटमेंट चेक करु शकता.
रजिस्टर टाइप करा आणि तुमच्या पोस्ट ऑफिस सेविंग किंवा करंट अकाउंटच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 7738062873 वर पाठवा. एसएमएस सुविधेनंतर, तुम्ही बॅलेन्स टाईप करून 7738062873 वर पाठवून तुमचे बॅलेन्स चेक करु शकता. यासोबतच मिनी टाइप करुन 7738062873 वर पाठवा आणि मिनी स्टेटमेंट चेक करा.
Home Loan घेण्यापूर्वी अवश्य घ्या ही माहिती, स्वस्तात मिळेल होम लोनमिस्ड कॉल बँकिंग सेवेसाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी, तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल फोनवरून 8424054994 डायल करा. एकदा तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड झाल्यानंतर, तुम्ही मिनी स्टेटमेंट आणि बॅलेन्स इंक्वायरीसाठी 8424054994 वर मिस्ड कॉल देऊ शकता.
IPPB मोबाइल अॅप डाउनलोड करा. अकाउंट नंबर, कस्टमर आईडी नंबर भरा. रजिस्टर्ड मोबाईल फोनवर OTP प्राप्त होईल. ते व्हेरिफाय करेल. OTP नंतर रजिस्ट्रेशन पूर्ण होईल. अॅपवर लॉग इन करून MPIN सेट करा. डॅशबोर्डच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या खात्यातील बॅलेन्स तपासू शकता.
LIC किंवा पोस्ट ऑफिसची पॉलिसी घेण्याचा विचार करताय? कोणती आहे बेस्ट?रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरून 155299 (टोल-फ्री) डायल करा आणि IVRS आदेशाचे पालन करा. यासाठी भाषा निवडा आणि तुमचे सेविंग्स अकाउंट डिटेल्स निवडा. तुमच्या खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी गेट बॅलन्स पर्याय निवडा.
पोस्ट ऑफिसच्या QR कोडवर दिसणारा QR कोड स्कॅन करावा लागेल. मोबाईल नंबरवर OTP द्यावा लागेल, तो व्हेरिफाय करा. आता OVD प्रमाणीकरण भरा आणि तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनवर कोणत्याही अडचणीशिवाय अकाउंटमधील बॅलेन्स दिसले.
भारतीय पोस्टच्या अधिकृत वेबसाइटवर जा. वेबसाइटवर अकाउंट तयार करावे लागेल. तुम्हाला यूजर आयडी आणि पासवर्ड मिळेल. डीओपी ई-बँकिंग पोर्टलवर लॉग इन करा आणि यूझर आयडी आणि पासवर्ड टाका. रजिस्टर मोबाइल नंबर टाका. OTP येईल आणि व्हेरिफाय करण्यासाठी OTP टाका. आता अकाउंट पर्याय निवडा आणि तुम्ही तुमच्या खात्यातील बॅलेन्स तपासू शकता.