मुंबई, 15 मे : बँकेकडून कर्ज घेताना क्रेडिट स्कोअर किंवा सिबिल स्कोअरचा सामना करावा लागतो. कर्ज घेताना योग्य क्रेडिट स्कोअर असणे अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या क्रेडिट स्कोअरच्या आधारे बँक तुमच्या नावावर कर्ज पास करते. त्यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोअरची माहिती तुमच्याकडे असली पाहिजे. क्रेडिट स्कोर 900 च्या जवळ असणे सर्वात अचूक मानला जातो. 750 स्कोअर असल्यास ग्राहकाला कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळण्याची शक्यता वाढते. 750 ते 900 च्या दरम्यान स्कोर असल्यास कर्ज मिळणे सोपे होते. CIBIL स्कोर जितका चांगला असेल तितके कर्ज मिळण्याची शक्यता वाढते. 550 ते 700 चा स्कोअर सरासरी मानला जातो. तर 700 आणि 900 मधील स्कोअर खूप चांगला असल्याचे म्हटले जाते. तुम्ही नेहमी तुमचा क्रेडिट स्कोअर 750 ते 900 दरम्यान ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बँकेच्या कामकाजासंबंधी नवीन नियम लागू, पैसे जमा करणे किंवा काढण्याआधी समजून घ्या तुमचा सिबिल स्कोअर किती आहे हे तपासण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. CIBIL ही देशातील चार क्रेडिट रेटिंग एजन्सीपैकी एक आहे. येथे तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोअर विनामूल्य तपासू शकता. CIBIL च्या https://www.cibil.com या वेबसाइटला भेट देऊन ते पाहता येईल. याशिवाय, बँकिंग सेवा एकत्रित करणाऱ्यांच्या वेबसाइटवरही क्रेडिट स्कोअर सहज तपासता येतो. तसेच, आपण आपल्या स्मार्टफोनमध्ये पेटीएम अॅपद्वारे देखील ते सहजपणे क्रेडिट स्कोर तपासू शकता. पेटीएम अॅपच्या All Services जाऊन तुम्हाला फ्री क्रेडिट स्कोरचा पर्याय मिळेल. जिथे तुम्ही तुमचा तपशील भरून स्कोर तपासू शकाल. Pension Scheme: ‘या’ सरकारी योजनेतून निवृत्तीनंतर मिळेल पेन्शन, किती आणि कुठे करावी लागेल गुंतवणूक? चेक करा बँका क्रेडिट हिस्ट्रीवर लक्ष ठेवतात बँका तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीवर लक्ष ठेवतात. कर्जाची नियमित परतफेड केल्याने क्रेडिट स्कोअर चांगला राहतो. जर तुम्ही EMI वर कोणतीही वस्तू घेतली असेल तर तो वेळेवर भरा. CIBIL स्कोअर 24 महिन्यांच्या क्रेडिट हिस्ट्रीवर आधारित आहे. म्हणून कर्ज घेण्यापूर्वी 24 महिन्यांत तुम्ही कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करणार नाही याची खात्री करा. या दरम्यान, जर तुम्ही बँकेकडून कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतले असेल तर ते वेळेवर भरा. बँकेकडून घेतलेले कर्ज वेळेवर न भरल्यास ग्राहकांचा क्रेडिट स्कोअर खराब होतो. तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल आणि ते वेळेवर जमा केले नाही तर त्याचा क्रेडिट स्कोअरवरही परिणाम होतो. तुम्ही बँक खात्यात किमान शिल्लक ठेवली नाही किंवा त्यात उणे शिल्लक ठेवली तरीही तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो.