राशन कार्ड
भारतात रेशन वितरणाची योजना अनेक वर्षांपासून सुरू आहे. याद्वारे देशभरातील लोकांना ठराविक दराने रेशन दिले जाते आणि गेल्या काही वर्षांत कोरोनामुळे सरकारने मोफत रेशन देण्याची योजनाही सुरू केली, जी अजूनही सुरू आहे. मात्र या रेशन योजनेंतर्गत लाभ मिळवण्यासाठी लोकांकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे.
सरकारकडून दिले जाणारे रेशन मिळवण्यासाठी लोकांकडे रेशन कार्ड असणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र असणे आवश्यक आहे. रेशनकार्डच्या मदतीने व्यक्तीला मोफत रेशन मिळू शकते. राज्य सरकारकडून गरजू नागरिकांना रेशन कार्ड दिले जाते.
रेशन वाटपाचे अधिकार राज्य सरकारांच्या हातात असल्याने रेशनकार्ड बनवण्याचे कामही राज्य सरकारच्या अखत्यारीत येते. प्रत्येक राज्यातील लोकांसाठी रेशन कार्ड बनवण्याचे पोर्टल वेगळे आहे. तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात तर http://mahafood.gov.in/website/english/home.aspx या वेबसाइटवर जाऊन रेशन कार्डसाठी अप्लाय करु शकता. या पोर्टलवर तुम्हाला नाव, पत्ता आणि उत्पन्नाशी संबंधित माहिती द्यावी लागेल. माहिती बरोबर आढळल्यास तुमचे रेशन कार्ड बनवले जाईल.
SBI च्या या स्किमवर मिळतंय बंपर व्याज! एकदा पैसे लावा मग दरमहा घरबसल्या होईल कमाईऑनलाइन रेशनकार्ड मिळवण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत. यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र यापैकी एक असणे आवश्यक आहे. यासोबतच, तुम्ही तुमच्या घराच्या पत्त्याचा पुरावा म्हणून वीज किंवा पाण्याची पावती स्लिप घेऊ शकता. रेशन कार्ड काढण्यासाठी उत्पन्नाचा दाखलाही आवश्यक आहे.
कुठे मिळतंय 9.50% पेक्षाही जास्त व्याज? या बँकेने वाढवले FD इंटरेस्ट रेटरेशन कार्ड हे केवळ रेशन मिळवण्याचे साधन नाही तर एक प्रकारे ते लोकांच्या ओळखीचा आधारही आहे. यामध्ये आधार कार्डप्रमाणेच व्यक्तीशी संबंधित सर्व आवश्यक माहिती नोंदवली जाते.