नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी: रेशन कार्डमध्ये (Ration Card) एखाद्या नव्या फॅमिली मेंबरचं नाव जोडायचं असेल, तर हे काम तुम्ही अगदी सहजपणे करू शकता. तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी नव्या सदस्याचं नाव रेशन कार्डमध्ये (How to Add Name in Ration Card Online) जोडू शकता. कागदपत्र - - मुलांचं नाव जोडण्यासाठी कुटुंब प्रमुखाचं रेशन कार्ड, मुलाचं बर्थ सर्टिफिकेट आणि आई-वडिलांचं आधार कार्ड देणं आवश्यक आहे. - घरात कुटुंबात नवीन आलेल्या सुनेचं नाव जोडण्यासाठी महिलेचं आधार कार्ड, मॅरेज सर्टिफिकेट, पतीचं रेशन कार्ड लागेल. तसंच मुलीच्या घरी तिच्या रेशन कार्डमधून नाव हटवण्यासाठीचं सर्टिफिकेटही देणं गरजेचं आहे.
अशाप्रकारे ऑनलाइन जोडा नाव - - सर्वात आधी राज्याच्या अन्न पुरवठा अधिकृत साइटवर जावं लागेल. - त्यानंतर Login ID बनवावं लागेल. - आता होम पेजवर नव्या सदस्याचं नाव जोडण्यासाठीचा पर्याय दिसेल. यावर क्लिक करा. - इथे समोर नवा फॉर्म दिसेल. - या फॉर्ममध्ये कुटुंबातील नव्या सदस्याची माहिती भरा. - फॉर्मसह आवश्यक डॉक्युमेंट्स आणि सॉफ्ट कॉपीही अपलोड करावी लागेल. - फॉर्म सबमिट केल्यानंतर एख रजिस्ट्रेशन नंबर मिळेल. - यामुळे याच पोर्टलवर तुम्ही आपला फॉर्म ट्रॅक करू शकता. - फॉर्म-डॉक्युमेंट्स अधिकारी चेक करतील. योग्य माहिती असल्यास तुमचा फॉर्म स्वीकारला जाईल. - त्यानंतर पोस्टद्वारे रेशन कार्ड तुमच्या घरी येईल.
ऑफलाइन प्रक्रिया - - आवश्यक ती सर्व डॉक्युमेंट्स सोबत घेऊन जवळच्या अन्न पुरवठा केंद्रात जावं लागेल. - इथे नव्या सदस्याचं नाव जोडण्यासाठी फॉर्म भरावा लागेल. - फॉर्ममध्ये संपूर्ण माहिती भरुन कागदपत्रांसह फॉर्म विभागात जमा करावा लागेल. - इथे काही अर्जसाठी फी देखील भरावी लागेल. - फॉर्म जमा झाल्यानंतर अधिकारी तुम्हाला एक रिसिप्ट देतील. ती सांभाळून ठेवावी लागेल. - या रिसिप्टद्वारे तुम्ही अर्जाचं ऑनलाइन स्टेटस तपासू शकता. - अधिकारी फॉर्मची आणि डॉक्युमेंट्सची पडताळणी करतील आणि कमीत-कमी 2 आठवड्यात रेशन कार्ड घरी पाठवलं जाईल.