ऑनलाइन फसवणुकीमध्ये वाढ
मुंबई, 1 जून : देशात ऑनलाइन फसवणुकीची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. दिवसेंदिवस अनेक प्रकरणे समोर येत आहेत. ग्राहकांच्या पैशावर डल्ला मारण्यासाठी गुंडांनी फसवणुकीचे नवनवीन मार्गही शोधले आहेत. सायबर फसवणूक करण्यासाठी ते नवीन टेक्नीक वापरत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही प्रकरणांबद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये लोकांची मोठी फसवणूक झाली आहे. अशा वेळी तुम्ही सतर्क राहणं गरजेचं असतं. अन्यथा हे गुन्हेगार तुम्हालाही चुना लावू शकता.
नवीन पद्धतीमध्ये, बँकेशी जोडलेले तुमचे UPI अकाउंटवर लक्ष्य केले जातेय. अनेक लोकांसोबत सायबर फसवणूक झाली आहे. यामुळे तुम्ही देखील या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. एखाद्या अनोळखी व्यक्तीने फोनवर असे काम करण्यास सांगितले तर लगेच फोन डिस्कनेक्ट करा आणि नंबर रिपोर्ट करा. याच्या मदतीने तुम्ही केवळ स्वतःचे रक्षण करणार नाही तर अधिक लोकांना मदत करू शकता.
उदाहरणासाठी आपण एक सत्य घटना समजून घेऊ. राहुल नावाच्या 25 वर्षीय व्यक्तीने XYZ शॉपिंग वेबसाइटवरून 30,000 रुपयांचा फोन ऑर्डर केला. फोन 17 मे रोजी दिला जाणार होता पण 16 मे रोजी राहुलला फोन आला आणि कॉलरने आपली ओळख XYZ कंपनीची ग्राहक सेवा म्हणून दिली. यानंतर त्याने राहुलला त्याच्या सामानाची माहिती दिली आणि पत्ता कन्फर्म करायचा असल्याचे सांगितले.
How Internet Works: इंटरनेट कसं काम करतं कधी विचार केलाय? समुद्रात अंथरल्या आहेत तारामात्र, राहुलने त्याचा पत्ता आधीच शॉपिंग वेबसाइटवर टाकला होता. त्यामुळेच हा ठगांचा फोन आहे हे पक्क झालं. राहुल बोलत राहिला आणि ठग म्हणाला की तुम्हाला एक लिंक पाठवली जात आहे, त्यावर क्लिक करून तुम्हाला अॅड्रेस कंफर्म करावा लागेल. राहुलने त्यावर क्लिक केल्यावर एक UPI पेमेंट गेटवे उघडला. यामध्ये त्याच्या बँकेचे डिटेल्स मागवण्यात आले. राहुलने या गुंडाला याबाबत चौकशी केली. यावेळी पत्ता कंफर्म करण्यासाठी राहुलला आधी 500 रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. बँक डिटेल्स टाकले असते तर अकाउंट रिकामंही होऊ शकलं असतं.
फक्त चॅटिंगसाठी नाही, आता लोन घेण्यातही कामी येईल WhatsApp; पाहा कसंयानंतर राहुलने त्याला सांगितले की, तू कस्टमर केअर नाही तर ठग आहेस हे मला समजले आहे. यासोबतच राहुलने या घटनेचा व्हिडिओ बनवल्याचेही सांगितले. हे ऐकताच गुंड संतापला आणि त्याने व्हिडिओ डिलीट करण्याची धमकी दिली. यानंतर फोन कट झाला.