पैसा
मुंबई : देशात डिजिटल आणि पारदर्शक व्यवहार व्हावेत यासाठी केंद्र सरकारकडून सतत प्रयत्न सुरू आहेत. पैशांचा रोख व्यवहार कमी करण्यासाठी सरकार सातत्याने अनेक निर्णय घेत आहे. ज्यामध्ये डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देत आहे. मात्र त्याचवेळी ऑनलाईन पेमेंटवरही मर्यादा लावण्यात आली आहे. जास्त पेमेंट केल्यास दंड आकारण्याच्याही काही तरतुदी आहेत. काही ठिकाणी मर्यादेपेक्षा जास्त पैसे भरल्यास किंवा रोखीने पैसे मिळाल्यास दंड मिळत नाही. दंड भरायचा नसेल तर खालील अटींकडे लक्ष द्या आणि कुठेही मर्यादेपेक्षा जास्त रोख रक्कम भरणे टाळा. काय आहे नियम? जास्त कॅश ट्रान्झक्शन केल्यास त्यावर दंड आकारला जातो. रोखीचे व्यवहार कमी करण्यासाठी हा निर्णय सरकारने घेतला आहे. ठराविक मर्यादेपेक्षा जास्त रोखीने व्यवहार केल्यास हा दंड तुम्हालाही लागू शकतो. आयकर कायद्याच्या कायद्याच्या कलम 269 एसएसनुसार 20 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम असेल तर तो चेक किंवा डीडी असायला हवा.
Debit Card : ग्राहकांना मोठा दणका, या बँकेनं वाढवले डेबिट कार्डवरील शुल्क20 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम व्यक्ती रोखीने स्वीकारू शकत नाही. त्यावर दंड आकारला जाऊ शकतो. त्यापेक्षा जास्त रक्कम घेताना जर तुम्ही आढळलात तर तुम्हाला दंड आकारला जाऊ शकतो. कोणत्या गोष्टींसाठी आकारला जात नाही? पार्टनरशिप फर्ममधील एखादा भागीदार कोणत्याही कामासाठी 20 हजारांपेक्षा जास्त रोख रक्कम घेत असेल तर त्याच्यावर कोणताही दंड आकारला जाणार नाही.
तुम्ही क्रेडिट कार्ड वापरता का? बँकेकडून आकारली जाते 6 प्रकारची फीजर तुम्ही जवळच्या नातेवाईकाकडे रोख रक्कम ठेवत असाल, म्हणजे त्याच्या ताब्यात पैसे देत असाल तर अशा रोख व्यवहारांवर कोणताही दंड आकारला जाणार नाही. इतर कोणत्याही मार्गाने पेमेंट करणे शक्य नव्हते हे कॅश ट्रान्झॅक्शनमध्ये सिद्ध झाले तरी दंड आकारला जाणार नाही.