JOIN US
मराठी बातम्या / मनी / एकापेक्षा जास्त Bank Account असणं कसं फायद्याचं? तज्ज्ञांनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

एकापेक्षा जास्त Bank Account असणं कसं फायद्याचं? तज्ज्ञांनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

एकापेक्षा जास्त खाती धोक्याची असतात असं म्हणतात, पण तज्ज्ञांच्या दृष्टीकोनातून जाणून घेऊया याचा कसा होतो लाँगटर्म फायदा?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : एकापेक्षा जास्त बँक खाती असू नयेत असं म्हणतात. पण दोन किंवा तीन खाती असली तर फायदाही होतो. आज बँक खाते असणे खूप महत्त्वाचे आहे. आता सरकारही सरकारी योजनांचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पाठवते. आर्थिक सल्लागारांचं याबाबत काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया. आर्थिक सल्लागारांच्या मते जास्त बँक खाती असणं फायद्याचं आणि तोट्याचं आहे. यामध्ये दोन गोष्टी आहे. एका बाजूला जास्त खाती असल्याने ITR फाईल करायला अडचणी येतात, पैसे अडकून राहतात, फसवणुकीचे प्रकार वाढतात अशा अनेक गोष्टी असल्या तरी एका पेक्षा जास्त खातं असायला हवं असंही सल्लागार म्हणतात. वेल्थ क्रिएटर्स फायनान्शियल अॅडव्हायझर्सचे सह-संस्थापक विनित अय्यर म्हणतात की, एखाद्या व्यक्तीची तीनपेक्षा जास्त बँक खाती नसावीत. 3 पर्यंत बँक खाते असल्‍याने तुम्हाला कोणते फायदे मिळू शकतात ते सांगितलं आहे. लाइव्ह मिंटच्या अहवालानुसार, अमित गुप्ता, एमडी, एसएजी इन्फोटेकचे एमडी म्हणतात की एखाद्या व्यक्तीची अनेक आर्थिक उद्दिष्टे असतात. मुलाचे शिक्षण, आपत्कालीन निधी आणि महिन्याचा खर्च इ. तुमच्याकडे सर्व आर्थिक गोष्टींसाठी स्वतंत्र बँक खाते असल्यास, तुम्ही तुमच्या बचतीचं नियोजन करू शकता. पैसे वेगवेगळ्या खात्यात विभागून ठेवल्याने कधीच आर्थिक संकट येणार नाही. तुमच्याकडे पर्यायी बँकेतील पैसे बॅकअपसाठी असतील. याचा अर्थ ते अव्वाच्या सव्वा खर्च करावेत असं नाही. तुम्ही तुमच्या खात्यात पैसे वळते दुसऱ्या खात्यातून करू शकता. पैशांची कमतरता भासणार नाही

आपत्कालीन स्थितीमध्ये तुम्ही दुसऱ्या बँकेतून पैसे काढू शकता. तुमच्याकडे दोन बँकांची खाती असतील तर तुम्ही दोन्ही बँकेतून रक्कम काढू शकता. एकावेळी एका कार्डमधून पैसे काढण्यासाठी रक्कम ठरवून दिलेली असते. त्यावर पैसे काढता येत नाहीत. चार्टर्ड अकाऊंटेंट राजेंद्र वाधवा सांगतात की, बँक बुडाल्यानंतर आता सरकार प्रत्येक खातेदाराला ५ लाख रुपये देते. जर तुमच्याकडे जास्त बचत खाते असेल तर तुमचे पैसे बुडण्याचा धोकाही कमी होतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या