म्यूच्युअल फंड
नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी: सध्याच्या काळात लोकांना गुंतवणुकीचं महत्त्व कळालंय. मात्र गुंतवणूक करताना बर्याच वेळा फसवणुक होण्याची शक्यता असते. तुमच्यावर अशी परिस्थिती येऊ शकते की, तुम्हाला SEBI कडे रजिस्टर्ड कोणत्याही सूचीबद्ध कंपनीविरुद्ध तक्रार दाखल करावी लागेल. ज्यावेळी अशी परिस्थिती उद्भवते तेव्हा सर्वप्रथम तुम्हाला ज्या कंपनीविरुद्ध तक्रार असेल त्या संबंधित कंपनीशी संपर्क साधावा लागेल. या काळात तुम्ही संबंधित कंपनीच्या प्रतिसादाने समाधानी न झाल्यास, त्यानंतर तुम्ही सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) किंवा म्युच्युअल फंड कंपनीकडे तक्रार करू शकता. SEBI सूचिबद्ध कंपन्यांच्या सिक्युरिटीजचे ट्रांसफर आणि लाभांश न देण्याशी संबंधित तक्रारी नोंदवते. याशिवाय सेबी वेगवेगळ्या रजिस्टर्ड मध्यस्थ म्हणजेच फंड हाउस आणि संबंधित मुद्द्यांविरोधात तक्रारी देखील घेते. SEBI तक्रार निवारण प्रणाली (SCORES) तुम्हाला तुमची तक्रार ऑनलाइन नोंदवण्याची आणि नंतर तिच्या स्थितीचे स्टेटस जाणून घेण्याची सुविधा देते.
SCORES एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. हे गुंतवणूकदारांना सिक्युरिटीज मार्केटशी संबंधित त्यांच्या तक्रारी सूचीबद्ध कंपन्या आणि SEBI रजिस्टर्ड मध्यस्थांविरुद्ध ऑनलाइन नोंदवण्यास मदत करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. या सर्व तक्रारी SEBI द्वारे SCORES द्वारे हाताळल्या जातात.
SEBI कायदा, सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन अॅक्ट, डिपॉझिटरीज अॅक्ट आणि कंपनी अॅक्ट, 2013 च्या संबंधित तरतुदींतर्गत बनवलेले नियम आणि विनियम या अंतर्गत समाविष्ट असलेल्या समस्यांमुळे उद्भवलेल्या तक्रारी SEBI च्या कक्षेत येतात.
SCORES वर तक्रार नोंदवण्यासाठी, गुंतवणूकदाराला प्लॅटफॉर्मवर रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. या सोप्या स्टेप्सच्या मदतीने तुम्ही तक्रार नोंदवू शकता.
तक्रार यशस्वीरित्या सबमिट केल्यावर, स्क्रीनवर एक सिस्टम जेनरेटेड यूनिक रजिस्ट्रेशन नंबर दिसेल. जो भविष्यातील रेफरेन्सेससाठी नोट करुन घ्या. तक्रार नोंदणी क्रमांकासह तक्रारीची पुष्टी करणारा ईमेल देखील तक्रार नोंदणी फॉर्ममध्ये टाकलेल्या ईमेल आयडीवर पाठवला जाईल. गुंतवणुकदाराला तक्रार नोंदवल्याबद्दल माहिती देणारा टेक्स्ट मॅसेज देखील पाठवला जाईल.
सेबीचे टोल फ्री हेल्पलाइन सर्व्हिस नंबर 1800 266 7575 किंवा 1800 22 7575 हे सिक्युरिटीज मार्केटशी संबंधित बाबींवर सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे देण्याच्या सोयीसाठी आहेत. टोल फ्री हेल्पलाइन सेवा भारतभरातील गुंतवणूकदारांसाठी 8 भाषांमध्ये आहे उपलब्ध आहे. ज्यात इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, तमिळ, बंगाली, तेलगू आणि कन्नड यांचा समावेश आहे.