मुंबई, 18 एप्रिल : घर किंवा गाडी खरेदी करण्याच्या तयारीत असणाऱ्यांसाठी थोडी निराशाजनक बातमी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBI ने आपले कर्ज महाग केले आहे. बँकेने सोमवारी सांगितले की इंटरनल बेंचमार्कशी जोडलेले व्याजदर 0.10 टक्क्यांनी वाढले आहेत. नवीन व्याजदर 15 एप्रिलपासून लागू झाल्याचे बँकेने म्हटले आहे. खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेनेही व्याजदरात 0.05 टक्क्यांनी वाढ केली आहे. SBI ने सांगितले की, त्यांनी मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) मध्ये 10 बेस पॉइंट्स किंवा 0.10 टक्क्यांनी वाढ केली आहे, जी 15 एप्रिल 2022 पासून लागू झाली आहे. या निर्णयानंतर बँकेची सर्व प्रकारची कर्जे, गृह, वाहन आणि इतर कर्जेही महाग झाली आहेत. मात्र रेपो रेटसारख्या बाहेरील बेंचमार्कशी जोडलेल्या कर्जांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. Gold Price Today: सोनं महिनाभराच्या उच्चांकावर; आज किती वाढली किमती? चेक करा नवे दर आता व्याजदर किती आहे? SBI च्या वेबसाइटनुसार, एक दिवस, महिना आणि तीन महिन्यांच्या कर्जाचे व्याज दर 6.65 टक्क्यांवरून वाढून 6.75 टक्के झाले आहेत. त्याचप्रमाणे, एक वर्षाच्या कर्जासाठी MCLR 7 टक्क्यांवरून 7.10 टक्के करण्यात आला आहे. सहा महिन्यांच्या कर्जासाठी MCLR 6.95 टक्क्यांवरून 7.05 टक्के करण्यात आला आहे. दोन वर्षांच्या कर्जावरील MCLR देखील 10 बेस पॉईंट्सने 7.30 टक्क्यांनी वाढवला आहे, तर तीन वर्षांची कर्जे आता 7.40 टक्के या प्रारंभिक व्याज दराने उपलब्ध असतील. Bank Time: आजपासून बँकांच्या कामकाजाच्या वेळेत बदल, ग्राहकांना होईल फायदा अॅक्सिस बँकेच्या ग्राहकांवरही परिणाम MCLR हे कोणत्याही बँकेच्या अंतर्गत खर्च आणि खर्चाच्या आधारावर व्याजदर निश्चित करण्यासाठीचे मानक आहे, तर आता बहुतेक बँका रेपो दराशी संबंधित कर्ज वितरित करतात. यामध्ये कोणताही बदल तेव्हाच होतो जेव्हा RBI रेपो रेट बदलते. EMI चा बोजा कसा वाढेल समजून घ्या जर एखाद्याने 20 वर्षांसाठी एसबीआयकडून 20 लाख रुपयांचे कर्ज घेतले असेल आणि त्यावर 7 टक्के व्याज दिले असेल तर 15,506 रुपयांचा EMI येईल. आता हे कर्ज 7.10 टक्के व्याजदराने वाढले आहे, त्यामुळे समान रक्कम आणि त्याच कालावधीसाठी EMI 15,626 रुपये होईल. म्हणजेच ईएमआय म्हणून दरवर्षी 1,440 रुपयांचा बोजा वाढणार आहे.