JOIN US
मराठी बातम्या / मनी / ...म्हणून गेल्या 3 दिवसांत सोनं 630 रुपयांनी झालं महाग

...म्हणून गेल्या 3 दिवसांत सोनं 630 रुपयांनी झालं महाग

Gold Price Hike - दिवसेंदिवस सोन्याच्या किमती तेजीनं वाढतायत. त्याची ही कारणं

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 जून : आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या तेजीमुळे घरगुती बाजारात सोन्याच्या किमतीत पाचव्या दिवशी तेजी आली. अखिल भारतीय सराफा संघानं दिलेल्या माहितीनुसार सोनं 70 रुपये आणि मजबूत होऊन 34,370 रुपये प्रति ग्रॅमवर पोचलंय. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार अमेरिकेच्या सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हनं बैठकीत व्याज दर स्थिर ठेवलेत. पण पुढच्या बैठकीत व्याज दर कमी करण्याचे संकेत दिलेत. त्यामुळे अमेरिकन डाॅलरची किंमत कमी झालीय. यामुळे सोन्याच्या भावात तेज आलीय. पुढच्या काही दिवसांत सोन्याची किंत 1000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत तेजीत असण्याची शक्यता आहे. तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर थोडे दिवस थांबा. सोनं स्वस्त होईल असं काही चिन्ह दिसत नाही. ISRO मध्ये ‘या’ पदांवर होतेय भरती, 10वी झालेले करू शकतात अर्ज गेले तीन दिवस दिल्ली सराफा बाजारात सोन्याची किंमत 33,740 रुपये प्रति 10 ग्रॅमवरून वाढून 34,370 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोचलीय. शनिवारी ( 22 जून ) सोनं 70 रुपयांनी 15 आठवडाभर 34370 रुपये प्रति किलोग्रमवर पोचलंय.या दरम्यान चांदीत गिरावट येऊन 39000 रुपये प्रति किलोग्रॅम झालीय. नोकरदारांसाठी महत्त्वाचं; ‘हे’ आहेत फाॅर्म 16शी जोडलेले अधिकार तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे पुढच्या आठवड्यात सोन्यात तेजीच पाहायला मिळेल. मुंबईत सोनं 35 हजार रुपयांपर्यंत पोचलंय. सध्या मुंबई बाजारात 995-24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 34 हजार प्रति ग्रॅम सुरू आहे. फक्त 1.30 लाखात सुरू करा ‘हा’ व्यवसाय आणि कमवा 5.5 लाख रुपये अमेरिका आणि इराणमधल्या तणावामुळेही सोन्याच्या किमती वाढतायत. अमेरिकेनं व्याजदरात कपात केलीय. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करणं पसंत केलं. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यानं उच्चांक गाठलाय. याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवरही झाला. दोन दिवसांपूर्वी एससीएक्सवर प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 797 रुपयांनी वधारून 33,876 रुपये झाला होता. चांदीचा भाव प्रति किलो 843 रुपयांनी वधारून 38,147 रुपये झाला होता. VIDEO :…तर तुमची दुकानं बंद करून टाकू, उद्धव ठाकरेंचा थेट इशारा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या