JOIN US
मराठी बातम्या / मनी / Gold-Silver Price Today: अक्षय्य तृतीयेआधी सोनं-चांदीच्या किमतीत मोठी उसळी, तपासा लेटेस्ट दर

Gold-Silver Price Today: अक्षय्य तृतीयेआधी सोनं-चांदीच्या किमतीत मोठी उसळी, तपासा लेटेस्ट दर

गेल्या काही सत्रांतील घसरणीनंतर आता सोन्याचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीत सातत्याने चढ-उतार होत आहेत

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 29 एप्रिल : जागतिक बाजारात भाव वाढल्यामुळे शुक्रवारी सकाळी सोन्या-चांदीच्या दरात (Hike in Gold and Silver Price) मोठी उसळी पाहायला मिळाली. सोन्याने पुन्हा एकदा 51 चा टप्पा पार केला, तर चांदीचे दरही 64 हजारांच्या वर आहेत. मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, 24-कॅरेट शुद्धतेच्या सोन्याच्या वायद्यात सकाळी सुमारे 0.56 टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळे सोन्याचा भाव 353 रुपयांनी वाढून 51,615 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. यापूर्वी सलग सहा सत्रांत सोन्याच्या दरात घसरण झाली होती. गुरुवारीच सोन्याचा भाव सुमारे 400 रुपयांनी खाली आला होता. Akshaya Tritiya 2022: या शुभ मुहूर्तावर Google Pay वरून खरेदी-विक्री करा सोनं; सोपी आहे प्रक्रिया आजच्या व्यवहारात चांदीच्या दरातही मोठी उसळी दिसून आली आहे. एमसीएक्सवर, सकाळी चांदीच्या वायद्यात 0.44 टक्क्यांनी वाढ झाली आणि चांदी 433 रुपयांनी महागून 64,350 रुपये प्रति किलो झाली. सकाळी एक्स्चेंज उघडल्यावर चांदीचा भाव 64,150 रुपये प्रति किलोवर सुरू झाला. यापूर्वी चांदीचे भावही सातत्याने घसरत होते आणि 64 हजारांच्या खाली गेले होते. आज जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरातही तेजी दिसून येत आहे. यूएस ट्रेझरी उत्पन्नात घट झाल्यामुळे आज सोन्याचे भाव वाढले. एक दिवसापूर्वीपर्यंत $1,900 च्या खाली व्यवहार करत असलेली सोन्याची किंमत आज सुरुवातीच्या व्यवहारात वाढलेली पाहायला मिळाली. अमेरिकन बाजारात सोन्याची किंमत 0.63 टक्क्यांनी वाढून $1,907.51 प्रति औंस झाली. त्याचप्रमाणे जागतिक बाजारातही चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज सकाळी चांदीची किंमत 1.09 टक्क्यांनी वाढून 23.43 डॉलर प्रति औंस झाली. पाम तेलाचा भडका! केक-चॉकलेटपासून साबण ते शॅम्पूपर्यंतच्या किमती वाढणार, हे आहे कारण कमोडिटी तज्ज्ञ अजय केडिया सांगतात की, गेल्या काही सत्रांतील घसरणीनंतर आता सोन्याचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीत सातत्याने चढ-उतार होत आहेत. या संकटावर लवकर तोडगा न निघाल्यास भारतीय बाजारात सोनं ६० हजारांचा टप्पा पार करेल. मात्र, युद्ध संपल्यानंतरही रशियावरील निर्बंधांचा प्रभाव दीर्घकाळ राहील. अशा परिस्थितीत सोन्याच्या दरात जरी घसरण झाली तरी त्याची किंमत 50 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या खाली जाणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या