JOIN US
मराठी बातम्या / मनी / आता हेल्थ इन्शुरन्स घेणं झालं सोपं, झालेत 'हे' मोठे बदल

आता हेल्थ इन्शुरन्स घेणं झालं सोपं, झालेत 'हे' मोठे बदल

Health Insurance - आरोग्य विम्यासंबंधी एक मोठा बदल झालाय

जाहिरात

Patient medical bills and insurance claim form, with piggy bank

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 सप्टेंबर : हेल्थ इन्शुरन्स खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. तुम्ही आता तुमचा इन्शुरन्स दर महिन्याला प्रीमियम भरून घेऊ शकता. आरोग्य विम्याला प्रोत्साहन देण्यासाठी आता दर महिन्याला किंवा तिमाही, सहा महिन्यांनी प्रीमियम देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिलीय. आता इन्शुरन्स कंपनी IRDAI च्या मंजुरीशिवाय छोट्या छोट्या प्राॅडक्ट्समध्ये छोटे बदल करू शकणार आहेत. यात जास्त रायडरपासून जास्त वयातल्या इन्शुरन्सपर्यंत कव्हर देणं याचा समावेश आहे. या बदलामुळे पाॅलिसी होल्डर्सना बरेच फायदे होणार आहेत. इरडानं तसं पत्रक प्रसिद्ध केलंय. ICICI बँक सुरू करणार 450 शाखा, 3500 कर्मचाऱ्यांना मिळणार नोकऱ्या असा देऊ शकाल प्रीमियम कुणीही ग्राहक हेल्थ इन्शुरन्स किंवा जनरल इन्शुरन्स घेत असेल, तो महिना, तिमाही, सहामाही आणि वार्षिक प्रीमियम भरू शकेल. त्यासोबत विमा कंपनी पाॅलिसी डाॅक्युमेंट्समध्ये छोटे बदल करू शकेल, म्हणजे पाॅलिसी होल्डर्सला याबद्दल योग्य माहिती कळेल. यामुळे पाॅलिसी कव्हरेजचे नियम आणि अटी यात कसलेच बदल होणार नाहीत. SBI डेबिट कार्डानं तुम्ही ‘इतक्या’ वेळाच काढू शकता पैसे, नाही तर पडेल भुर्दंड पाॅलिसी होल्डर्सना फायदा पाॅलिसी होल्डरला पूर्ण प्रीमियम भरावा लागणार नाही. आरोग्य विम्याला प्रोत्साहन  मिळेल. लोक जास्त कव्हरेजचा इन्शुरन्स घेतील. त्याप्रमाणे कंपनी प्राॅडक्ट बनवतील. सोनं-चांदी झालं महाग, ‘हे’ आहेत मंगळवारचे दर 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनाही सहज मिळेल कव्हर या पत्रकाअनुसार 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनाही इन्शुरन्स प्राॅडक्ट खरेदी करता येईल. कंपनीला इरडाची परवानगी घ्यावी लागेल. कंपनी प्रीमियम रक्कम 15 टक्के वाढवू किंवा कमी करू शकते. इरडानं पाॅलिसी धारकांना एक मोठा फायदा म्हणजे, विमा घेतल्यानंतर तुम्ही गंभीर आजारांनाही या विम्याशी जोडू शकता. VIDEO : शरद पवारांवर गुन्हा दाखल झाल्यामुळे एकनाथ खडसेंनी व्यक्त केलं आश्चर्य, म्हणाले…

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या