JOIN US
मराठी बातम्या / मनी / HDFC बँक ग्राहकांची अनेक कामं एका SMSवर होणार; मोबाईलवर बँकेच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी काय करावं लागेल?

HDFC बँक ग्राहकांची अनेक कामं एका SMSवर होणार; मोबाईलवर बँकेच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी काय करावं लागेल?

HDFC SMS Service: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या एसएमएस बँकिंग सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाला मोठा मेसेज पाठवण्याची गरज नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 सप्टेंबर : खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या HDFC बँकेने आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी SMS बँकिंग सेवांचा विस्तार केला आहे. बँकेने सांगितले की, आता ग्राहक कुठूनही 24/7×365 आमच्या सुविधांचा लाभ घेऊ शकतात. त्यासाठी त्यांना फक्त एक SMS करावा लागेल. एचडीएफसी बँकेच्या म्हणण्यानुसार, नवीन SMS सुविधेद्वारे, ग्राहकांना त्यांच्या खात्यातील शिल्लक आणि समरी जाणून घेता येईल. याशिवाय, तुम्ही कर्जासाठी अर्ज करणे, क्रेडिट कार्ड मॅनेज करणे, चेक बुकची रिक्वेस्ट करणे आणि अकाउंट स्टेटमेंट रिक्वेस्ट करणे यासारखी कामे कुठूनही करू शकाल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या एसएमएस बँकिंग सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाला मोठा मेसेज पाठवण्याची गरज नाही. फक्त बँकिंग भाषा वापरलीच पाहिजे असे नाही, तर ग्राहक जे काही त्याच्या सामान्य भाषेत लिहील ते AI समजेल आणि रिप्लाय देईल. या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल एचडीएफसी बँकेने ट्विटमध्ये म्हटले आहे की, बँकिंग सेवा आता फक्त एक मेसेज दूर आहे. #BankOnUs तुम्ही कोठेही असाल, तुम्हाला बँकिंग सेवा पुरवली जाईल. तुम्हाला ही सुविधा दिवसाचे 24 तास, आठवड्याचे 7 दिवस आणि वर्षातील 365 दिवस मिळेल. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एसएमएसमध्ये रजिस्टर लिहून स्पेस द्यावी लागेल, त्यानंतर कस्टमर आयडीचे शेवटचे चार अंक, त्यानंतर खाते क्रमांकाचे शेवटचे चार अंक लिहून 7308080808 वर पाठवावा लागेल.

केंद्र सरकारच्या ‘ही’ योजना पुढील महिन्यापासून बंद होणार; योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावं लागेल?

संबंधित बातम्या

बँकेने सांगितले की, एकदा ग्राहकाने या क्रमांकावर स्वत:ची नोंदणी केली की, ग्राहकाला हवी असलेली कोणतीही सुविधा केवळ एका SMS वर उपलब्ध होईल. एसएमएस बँकिंग सुविधेसाठी नोंदणी करण्यासाठी तुम्ही अर्ज केल्यास, या प्रक्रियेस चार कामकाजाचे दिवस लागतील. नोंदणीसाठी अर्ज सादर केल्यानंतर हा कालावधी सुरू होईल. ग्राहकाला सूचना मिळेल एसएमएस बँकिंगसाठी तुमची नोंदणी केल्यानंतर, बँकेकडून मोबाइलवर एक मेसेज पाठवला जाईल. त्यात लिहिलेले असेल, तुमची नोंदणी यशस्वी झाली आहे. तुमचे बँक खाते एचडीएफसी बँकेच्या एसएमएस बँकिंग सेवेसाठी डीफॉल्ट खाते म्हणून नोंदवले गेले आहे. ही सुविधा पूर्णपणे मोफत असणार असून सध्या ती फक्त इंग्रजी भाषेत सुरू करण्यात आली आहे. Multibagger Share: 2 रुपयांच्या शेअरची कमाल; 1 लाख रुपयांची गुंतवणूक बनली 50 कोटी, तुमच्याकडे आहे का? एटीएममधूनही नोंदणी करू शकता » सर्वप्रथम तुमच्या जवळच्या HDFC बँकेच्या ATM वर जा. » तुमचे डेबिट-एटीएम कार्ड टाका आणि पिन टाका. » एटीएमच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या ‘More Option’ वर जा आणि एसएमएस बँकिंग नोंदणीसाठी तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर टाका. » ‘कन्फर्म’ बटण दाबल्यानंतर तुमच्या मोबाईलवर यशस्वी नोंदणीचा मेसेज येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या