JOIN US
मराठी बातम्या / मनी / HDFC बँकेनं ग्राहकांसाठी आणलीय खास लिमिटेड ऑफर, पाहा तुम्हाला कसा होणार फायदा

HDFC बँकेनं ग्राहकांसाठी आणलीय खास लिमिटेड ऑफर, पाहा तुम्हाला कसा होणार फायदा

तुम्ही HDFC बँकेत ऑनलाईन FD करू शकता. याशिवाय बँकेनं आणखी काही ऑफर्स जारी केल्या आहेत. याची माहिती तुम्हाला नेट बँकिंग सुरू केल्यानंतर ऑफर्समध्ये पाहायला मिळू शकतात.

जाहिरात

एचडीएफसी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : HDFC बँक आपल्या ग्राहकांच्या गरजा ओळखून वेळोवेळी खास ऑफर्स बाजारात आणत असते. आता पुन्हा एकदा बँकेनं खास ऑफर आणली आहे. ही ऑफर लिमिटेड कालावधीसाठी असणार आहे. त्यामुळे तुम्हाला ही ऑफर लागू होणार का त्याचा लाभ कसा घ्यायचा हे जाणून घेऊया. एवढंच नाही तुम्ही यात पैसे गुंतवले तर तुम्हाला दुप्पट रिटर्न्स देखील मिळणार आहेत. खासगी बँकांमधील सर्वात प्रसिद्ध बँक HDFC ने ग्राहकांसाठी खास FD वर ऑफर दिली आहे. बँकेने आपल्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार 35 महिने किंवा 2 वर्षे 11 महिन्यांच्या कालावधीसह विशेष FD योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 7.20 टक्के दराने व्याज मिळेल. दुसरी ऑफर खास बँक 55 महिने किंवा 4 वर्षे आणि 7 महिन्यांच्या कालावधीसह विशेष एफडीवर 7.25 टक्के दराने व्याज देत आहे.

HDFC बँकेच्या ग्राहकांना मोठा दणका, ‘या’ गोष्टीसाठी मोजावे लागणार जास्त पैसे

याशिवाय एचडीएफसी बँकेने एक वर्ष 15 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीचे व्याजदर बदलून ते 6.6 टक्के केले आहेत. त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर 7.1 टक्के करण्यात आला आहे.

तुम्हाला आता FD करण्यासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही ऑनलाईन नेटबँकिंगद्वारे लॉगइन करुन FD करु शकता. तुम्हाला यासाठी नेट बँकिंग सुरू करायचं आहे. तिथे FD पर्याय निवडायचा आहे. तुम्ही किती महिन्यांसाठी ठेवणार आणि मॅच्युरिटीनंतर तुमच्या खात्यावर रक्कम हवी की ऑटो रिन्यू करायची याची निवड करा आणि सबमिट करा.

HDFC बँकेकडून ग्राहकांना दणका! पुन्हा वाढवला व्याजदर, पाहा कितीने वाढणार तुमचा EMI

संबंधित बातम्या

अशा पद्धतीने तुम्ही HDFC बँकेत ऑनलाईन FD करू शकता. याशिवाय बँकेनं आणखी काही ऑफर्स जारी केल्या आहेत. याची माहिती तुम्हाला नेट बँकिंग सुरू केल्यानंतर ऑफर्समध्ये पाहायला मिळू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या