एचडीएफसीच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी
मुंबई, 9 एप्रिल: प्रायव्हेट सेक्टरमधील एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. एचडीएफसी बँक आपल्या ग्राहकांना विविध प्रकारचे डेबिट कार्ड जारी करते. तर, एचडीएफसी बँक मिलेनिया डेबिट कार्ड वापरून, तुम्ही एका वर्षात 4800 रुपये वाचवू शकता. महत्त्वाचं म्हणजे हे पैसे तुम्ही थेट बँक खात्यात घेऊ शकता. यासोबतच जर तुम्ही नेहमीच E-Wallet मध्ये मनी लोड करत असाल तर तुमच्यासाठी एचडीएफसी बँक मिलेनिया डेबिट कार्ड एक महत्त्वपूर्ण कार्ड ठरु शकते. या कार्डच्या माध्यमातून कोणत्याही E-wallet मध्ये मनी लोड केल्यास 1 टक्के कॅशबॅक मिळेल.
-मिलेनिया डेबिट कार्डसह PayZapp आणि SmartBuy द्वारे खर्च केल्यावर 5% कॅशबॅक पॉइंट्स उपलब्ध आहेत. -या डेबिट कार्डद्वारे सर्व ऑफलाइन खर्च आणि वॉलेट रीलोडवर 1% कॅशबॅक पॉइंट उपलब्ध आहे. -सर्व ऑनलाइन खर्चांवर 2.5% कॅशबॅक पॉइंट मिळते. -सर्व कॅटेगिरी एकत्र करून, तुम्ही एका वर्षात कमाल 4800 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवू शकता. -या कार्डद्वारे तुम्ही वर्षातून 4 वेळा डोमेस्टिक एअरपोर्ट लाउंज एक्सेस करू शकता. -या कार्डवर 10 लाख रुपयांपर्यंतचा अॅक्सीडेंटल इन्शुरन्स कव्हरेज उपलब्ध आहे.
ATM मधून कॅश काढल्यानंतर कॅन्सल बटण दाबणं गरजेचं? जाणून घ्या उत्तर-400 रुपयांपेक्षा जास्त ट्रांझेक्शनसाठी कॅशबॅक पॉइंट मिळू शकतात. -प्रति कार्ड जास्तीत जास्त 400 कॅशबॅक पॉइंट्स दरमहिन्याला मिळवता येतात. -नेटबँकिंगद्वारे कॅशबॅक पॉइंट 400 च्या पटीत रिडीम केले जाऊ शकतात. म्हणजे तुम्ही फक्त 400, 800, 1200, 1600, -2000, 2400 इत्यादी कॅशबॅक पॉइंट रिडीम करू शकता. -ट्रांझेक्शन केल्याच्या 90 दिवसांनंतर कॅशबॅक पॉइंट मिळतात. -कॅशबॅक पॉइंट्स एका वर्षाच्या आत रिडीम करावे लागतील. तुमचे कॅशबॅक पॉइंट एका वर्षानंतर संपतात. -एचडीएफसी बँक मिलेनिया डेबिट कार्डद्वारे विमा प्रीमियम पेमेंट, क्रेडिट कार्ड पेमेंट, इंधन, दागिने आणि इतर बिझनेस -सर्व्हिस ट्रांझेक्शनसाठी कोणतेही कॅशबॅक पॉइंट मिळत नाहीत.
How to Save Tax: नवीन आर्थिक वर्षात कसा सेव्ह करावा टॅक्स? या टिप्स ठरतील फायदेशीर-एचडीएफसी बँक नेटबँकिंगमध्ये लॉग इन करा. -आता Cards सेक्शनमध्ये जावं लागेल. -यानंतर डेबिट कार्ड सिलेक्ट करा. -आता Enquire वर क्लिक करा. नंतर CashBack Enquiry and Redemption वर जा आणि Account Number निवडा. -त्यानंतर Continue वर क्लिक करा आणि 400 च्या पटीत कॅशबॅक पॉइंट एंटर करा. रिडीम केल्यानंतर, या अमाउंट तुमच्या –HDFC सेव्हिंग अकाउंटमध्ये क्रेडिट केल्या जातात. येथे एका कॅशबॅक पॉइंटची व्हॅल्यू एक रुपयांपर्यंत असते.