JOIN US
मराठी बातम्या / मनी / Repo Rate Hike: HDFC बँकेच्या कर्जदारांची चिंता वाढली; सर्व प्रकारच्या कर्जाच्या व्याजदरात वाढ

Repo Rate Hike: HDFC बँकेच्या कर्जदारांची चिंता वाढली; सर्व प्रकारच्या कर्जाच्या व्याजदरात वाढ

HDFC बँकेने 5-10 बेसिस पॉइंट्सने ही वाढ केली आहे. HDFC बँकेने सर्व कर्जासाठीचा MCLR 5-10 बेसिस पॉइंट्सने वाढवला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 8 ऑगस्ट : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये तिसऱ्यांदा वाढ केल्यानंतर आता सर्वच बँका आपले कर्जाचे व्याजदर वाढवत आहे. देशातील सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसी बँकेने सर्व प्रकारच्या कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बँकेने 5-10 बेसिस पॉइंट्सने ही वाढ केली आहे. HDFC बँकेने सर्व कर्जासाठीचा MCLR 5-10 बेसिस पॉइंट्सने वाढवला आहे. ही वाढ आजपासून म्हणजेच 8 ऑगस्ट 2022 पासून तात्काळ लागू झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉइंट्स (0.50 टक्के) वाढ जाहीर केल्यानंतर बँकेने हा निर्णय घेतला आहे. ऑगस्टमध्ये झालेल्या आरबीआयच्या एमपीसीच्या बैठकीत महागाई नियंत्रित करण्याच्या उद्देशाने असा निर्णय घेण्यात आला होता. Online Shoppingवर होईल मोठी बचत, ‘या’ खास क्रेडिट कार्ड्सवर उपलब्ध आहेत विविध ऑफर्स रेपो दरात सलग तिसऱ्यांदा वाढ मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी, 5 ऑगस्ट रोजी चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीचे निकाल जाहीर केले आणि सांगितले की रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. या वाढीनंतर रेपो दर 5.40 टक्के झाला आहे. आरबीआयने या वर्षी सलग तिसऱ्यांदा रेपो दरात वाढ केली आहे. RBI ने यापूर्वी मे 2022 मध्ये अचानक रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ केली होती, तर जून 2022 MPC बैठकीत 0.40 टक्क्यांनी वाढ केली होती. अशाप्रकारे मे महिन्यापासून रेपो दरात एकूण 1.40 टक्के वाढ झाली आहे, जी गेल्या अडीच वर्षांतील सर्वोच्च आहे. या वाढीमुळे तुमचे गृह कर्ज, कार कर्ज आणि वैयक्तिक कर्जासह सर्व प्रकारची कर्जे महाग होणार आहेत. इतर बँका देखील लवकरच त्यांचे व्याजदर वाढवण्यास सुरुवात करतील. तुमचं व्यावसायिक होण्याचं स्वप्न पूर्ण करा; सरकारच्या ‘या’ योजनेचा घ्या फायदा, 10 लाखांपर्यंत कर्ज मिळेल

 याआधीच  ICICI बँक, PNB, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक यांनी त्यांचे व्याजदर वाढवले ​​आहेत. रेपो दरात वाढ केल्यानंतर बँक ठेव आणि कर्ज या दोन्हींवरील व्याजदरात वाढ करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या