JOIN US
मराठी बातम्या / मनी / PM Kisan: प्रतीक्षा संपली! उद्या शेतकऱ्यांना मिळणार 12व्या हप्त्याचे 2000 रुपये, सोबतच मिळणार खास भेट

PM Kisan: प्रतीक्षा संपली! उद्या शेतकऱ्यांना मिळणार 12व्या हप्त्याचे 2000 रुपये, सोबतच मिळणार खास भेट

PM Kisan 12th installment Date: सरकार पीएम किसान योजनेअंतर्गत 8.5 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 16,000 कोटी रुपयांची रक्कम पाठवली जाईल.

जाहिरात

PM Kisan: प्रतीक्षा संपली! उद्या शेतकऱ्यांना मिळणार 12व्या हप्त्याचे 2000 रुपये, सोबतच मिळणार खास भेट

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 ऑक्टोबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 ऑक्टोबरपासून दिल्लीत सुरू होणाऱ्या दोन दिवसीय कार्यक्रमादरम्यान पीएम किसान योजनेअंतर्गत 8.5 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 16,000 कोटी रुपयांची रक्कम इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवले जाणार आहेत. पुसा कॅम्पसमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमादरम्यान ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल. पंतप्रधान मोदी यांनी सुरु केलेल्या पीएम किसान योजनेचा हा 12 व्या हप्ता असणार आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 रुपये मदत जमा केली जाते.  या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारा हा 12 वा हप्ता असेल. त्यामुळे या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत वाढून 2.16 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढणार आहे. अनुदानावर  युरिया - याशिवाय पंतप्रधान 600 ‘पीएम किसान समृद्धी केंद्रां’चं उद्घाटन करतील आणि ‘एक राष्ट्र, एक खत’ योजनेअंतर्गत ‘भारत’ ब्रँड असलेल्या अनुदानित युरिया बॅगही सादर करतील. कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी पत्रकारांना सांगितलं की खत क्षेत्रासाठी उचललं गेलेलं सर्वात मोठं पाऊल म्हणून युरिया, डी अमोनिया फॉस्फेट (डीएपी), एमओपी आणि एनपीकेसह सर्व अनुदानित खते देशभरात एकाच ब्रँड ‘भारत’ अंतर्गत विकली जातील. हेही वाचा:   सावधान! सायबर चोर ‘या’ चार मार्गानं करतात तुमची फसवणूक, एका चुकीमुळे व्हाल कंगाल ‘इंडियन एज’ हे ई-मासिक सुरू करणार- कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान ‘भारत युरिया बॅग’ देखील सादर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की, सरकार कंपन्यांना ‘भारत’ ब्रँड अंतर्गत अनुदानित खतांची विक्री करणे बंधनकारक करत आहे. कृषी मंत्रालय आणि खत मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात येणाऱ्या ‘पीएम किसान सन्मान संमेलन 2022’ मध्ये पंतप्रधान मोदी आंतरराष्ट्रीय साप्ताहिक उर्वरक ई-मासिक ‘इंडियन एज’ प्रकाशित करतील. याशिवाय कृषी स्टार्टअप कार्यक्रम आणि प्रदर्शनाचे उद्घाटनही ते करणार आहेत. पीएम-किसान योजना फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आली. या अंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्याला दरमहा २ हजार रुपयांची मदत दिली जाते. या अंतर्गत तीन महिन्यांसाठी एका हप्त्यात 6,000 रुपये दिले जातात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या