JOIN US
मराठी बातम्या / मनी / आता युजर्सला मिळणार 'हे' हक्क, सरकारकडून नवीन टेलिकॉम कायदा आणण्याची तयारी

आता युजर्सला मिळणार 'हे' हक्क, सरकारकडून नवीन टेलिकॉम कायदा आणण्याची तयारी

सध्या हे विधेयक मांडण्यात आलं आहे. मात्र अद्याप याला मंजुरी मिळणं बाकी आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

असीम मनचंदा प्रतिनिधी मुंबई : फेसबुक, Whatsapp, टेलिग्राम सारखे OTT App लवकरच रेगुलेशनच्या अंतर्गत येण्याची शक्यता आहे. वाढत्या फसवणुकीवर आळा घालण्यासाठी नवीन धोरण आणण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे. याचा फायदा ग्राहकांना होणार आहे. 20 ऑक्टोबरपर्यंत उद्योग आणि तज्ज्ञांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत. ग्राहकांना सर्व जाणून घेण्याचा हक्क राहिल. व्हॉट्सअॅप किंवा इतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर कोण कॉल किंवा मेसेज करत याची माहिती देखील मिळवता येणार आहे. म्हणजेच हे विधेयक मंजूर झाल्यानंतर यूजर्सना कोण आणि कुठून कॉल करत आहे ही माहिती जाणून घेण्याचा अधिकार असेल. 6-10 महिने कायदा होऊ शकतो सध्या हे विधेयक मांडण्यात आलं आहे. मात्र अद्याप याला मंजुरी मिळणं बाकी आहे. त्याचा अंतिम मसुदा तयार केला जाईल. त्यानंतर सरकारने स्थापन केलेली समिती त्यास मान्यता देईल आणि त्यानंतर हे विधेयकाला संसदेच्या प्रक्रियेतून जावे लागेल.

मर्जर आणि अधीग्रहण प्रक्रिया अधिक सोपी करण्यावर भर असेल. एवढंच नाही तर टेलिकॉम कंपन्यांवरील दंडाच्या रकमेतही बदल करण्यात येणार आहे. जर कंपन्या दिवाळखोरीत निघत असल्याचं घोषित करत असतील तर त्यांना स्पेक्ट्रम सरकारकडे जमा करावं लागणार आहे. यासोबत काही नियमांमध्ये बदल केला जाईल जाचा फायदा आता ग्राहकांना होणार आहे. ज्याच्या नावाने कनेक्शन घ्यायचं आहे त्याचं नाव आणि KYC करावं लागेल. आता दुसऱ्या कोणाच्याही नावाने इंटरनेट कनेक्शन किंवा सिमकार्ड घेणं महागात पडू शकतं. यामुळे फसवणुकीच्या प्रकरणाला चाप बसेल असा दावा केला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या