JOIN US
मराठी बातम्या / मनी / Google कडून भारतासाठी आली आनंदाची बातमी! Digital India साठी 10 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Google कडून भारतासाठी आली आनंदाची बातमी! Digital India साठी 10 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Google चे CEO (मुख्य कार्यकारी अधिकारी) सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी 75000 कोटी रुपयांची गुंतवणूक फक्त भारतात करण्याची मोठी घोषणा केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 जुलै : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली जगातली अग्रगण्य कंपनी असणाऱ्या Google ने भारतासाठी आज मोठी आनंदाची बातमी दिली. गुगलने आपले भविष्यातले गुंतवणुकीचे आडाखे सादर केले आहेत आणि फक्त भारतामध्ये त्यांची 10 अब्ज डॉलर्सची म्हणजे जवळपास 75000 कोटी रुपयांची गुंतवणूक असणार आहे. Google चे CEO (मुख्य कार्यकारी अधिकारी) सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी आज ही मोठी घोषणा केली. Google For India अंतर्गत भारताच्या डिजिटायझेसनसाठी ही रक्कम असेल. सुंदर पिचाई यांनी Google for India या कार्यक्रमाअंतर्गत पुढच्या काही वर्षांत भारतात मोठी गुंतवणूक होणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. वेगवेगळ्या संस्थांमधली भागिदारी, इक्विटी (equity investments), पायाभूत सुविधा आणि डिजिटायझेशनसाठीच्या इतर सोयींसाठी ही 10 अब्ज डॉलर्सची रक्कम फक्त भारतात खर्च होईल. पुढच्या पाच ते सात वर्षांत ही गुंतवणूक होईल, असंही सुंदर पिचाई यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या

सुंदर पिचाई यांनी केलेल्या घोषणेतला महत्त्वाचा भाग असा की, भारताच्या डिजिटायझेशनमध्ये याचा फायदा होईल. शिवाय भारतीयांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत माहिती आणि सेवा देण्यासाठी गुगल प्रयत्न करणार आहे. त्यामुळे भारतीय भाषांमधल्या माहितीसाठी या गुंतवणुकीचा उपयोग होईल. Google for India digitisation fund या अंतर्गत ही गुंतवणूक केली जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या