JOIN US
मराठी बातम्या / मनी / खुशखबर! 'या' देशात भारताच्या ATM मधून पैसे काढता येणार, मिळणार ही सुविधा

खुशखबर! 'या' देशात भारताच्या ATM मधून पैसे काढता येणार, मिळणार ही सुविधा

भारताच्या UPI सिस्टिमचा लवकरच अमेरिकेत डंका वाजणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

आलोक प्रियदर्शी, नवी दिल्ली : आता भारताबाहेर जाणाऱ्या विद्यार्थी आणि नोकरदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अमेरिकेमध्ये भारतीय ATM कार्डही चालणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे भारतातील ATM कार्ड अमेरिकेत वापरू शकणार आहात. फक्त सगळे ATM कार्ड नाही तर एकाच बँकेचं ATM कार्ड चालणार आहे. भारताच्या UPI सिस्टिमचा लवकरच अमेरिकेत डंका वाजणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार US मध्ये UPI पेमेंटसोबत आता Rupay कार्ड लाँच करण्याची तयारी सुरू केली आहे. वित्तमंत्रालयाने याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. याचा सगळ्यात जास्त फायदा हा पर्यटक, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांना होणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा सर्वात मोठा दिलासा असेल. ही सुविधा लवकरच सुरू होईल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

सणासुदीला शेतकऱ्यांना मोठा फटका, MSP जाहीर करण्यासाठी उशीर

संबंधित बातम्या

पर्यटक, व्यावसायिकांचं शिष्टमंडळ आणि अमेरिकेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणावी लागणार आहे. भारतातील अनेक जण कामानिमत्ताने किंवा फिरायला किंवा शिकण्यासाठी अमेरिकेत जात असतात. यासाठी NPCI आणि RBI अमेरिकेच्या प्राधिकरणाशी बोलणी करत आहेत.

अमेरिका आघाडीचे PayPal, Stripe, WorldPay Evalon आणि PaymentWall यांच्याशी करार करण्याबाबत विचार सुरू आहे. गेल्या महिन्यात असिस्टंट यूएसटीआरच्या भारत भेटीदरम्यान यावर सविस्तर चर्चा झाली आहे. अर्थ मंत्रालयाकडून या विषयावर चर्चा करून लवकरच मंजुरी मिळू शकते. त्यामुळे ही भारतासाठी एक चांगली बातमी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या