मुंबई : लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे सोनं खरेदीची लगबग मार्केटमध्ये आहे. गुरुवारी सोन्याचे दर गगनाला भिडले होते. मात्र आज काहीसा दिलासा मिळाला आहे. सोन्याचे दर इंडियन MCX मार्केटमध्ये 143 रुपयांनी घसरून 52,528 वर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर 318 रुपयांनी घसरून 61,675 रुपयांवर आले आहेत. भारतातील सराफ बाजारा 22 कॅरेट सोन्याचे दर 50 हजारांपेक्षा कमी आले आहेत. इंडियन बुलियन मार्केट सोन्याचे दर निश्चित करते. तसंच प्रत्येक राज्यातील सोन्याच्या दरात थोडाफार फरक असतो. मुंबई, पुण्यासह महत्त्वाच्या शहरांमध्ये सोन्याचे दर कसे आहेत पाहा.
सोन्याच्या खरेदी-विक्रीवर नवा नियम, पैसे गुंतवणाऱ्यांना मोठा फायदा24 कॅरेट सोन्याचे दर | 1 ग्रॅम सोन्याचे दर- 5,271 | 10 ग्रॅम सोन्याचे दर- 52,710 |
---|---|---|
22 कॅरेट सोन्याचे दर | 4,832 | 48,318 |
20 कॅरेट सोन्याचे दर | 4,393 | 43,925 |
18 कॅरेट सोन्याचे दर | 3,953 | 39,533 |
16 कॅरेट सोन्याचे दर | 3,514 | 35,140 |
14 रेट सोन्याचे दर | 3,075 | 30,748 |
भारतीय सराफा बाजारात गुरुवारी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. दिल्ली सोने आणि चांदीच्या बाजारात सोन्याचा भाव ३२३ रुपयांनी वाढून ३२३ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. त्याचबरोबर चांदीचे दर 639 रुपये नोंदवण्यात आले.
लग्नासाठी सोन्याचे दागिने घ्यायचेत? जाणून घ्या खरेदी करताना काय घ्याल काळजीसोने गुरुवारी323 रुपयांनी वाढून 53,039 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. बुधवारच्या व्यापारात मौल्यवान धातू ५२,७१६ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. चांदी 639 रुपयांनी वाढून 62,590 रुपये प्रति किलो झाली आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, नायट्रिक अॅसिडचा खऱ्या सोन्यावर काहीही परिणाम होत नाही. परीक्षण करण्यासाठी दागिने थोडे खरवडून त्यावर नायट्रिक अॅसिड टाकावे. सोनं असेल तर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. व्हिनेगर जवळजवळ प्रत्येक स्वयंपाकघरात सहज उपलब्ध आहे.