सोनं खरेदी करताना लक्षात ठेवा या 3 गोष्टी, ज्वेलर्स कधीच करू शकणार नाहीत फसवणूक
मुंबई : सोनं खरेदीसाठी हीच योग्य वेळ आहे. ५० हजार रुपयांपेक्षा कमी सोन्याचे दर आले आहे. पुन्हा एकदा सोनं ४९ हजार ७६६ रुपयांवर पोहोचलं आहे. मंगळवारी शेअर मार्केटमध्ये तेजी दिसली. मात्र सोन्या-चांदीच्या दरात घसरण कायम आहे. ५० हजार रुपयांपेक्षा सोनं स्वस्त झालं आहे. बाजारपेठ बंद होताना सोनं ४९ हजार ७६६ वर बंद झालं. सोनं सोमवारपेक्षा १४० रुपयांनी महाग झालं आहे. तर चांदी २२२ रुपयांनी स्वस्त झाली आहे. चांदीचे दर सोमवारी ५७ हजार ४१४ होते. त्यावरून आता ५७ हजार १९२ रुपयांवर आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोमवारी सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,669 डॉलर प्रति औंस आणि चांदीचा भाव 19.27 डॉलर प्रति औंस होता. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले, “कॉम्क्सवर सोन्याचे भाव ०.४३ टक्क्यांनी कमी होऊन १,६६९ डॉलर प्रति औंस झाले. US FOMC बैठकीपूर्वी सोन्याचे भाव घसरल्याचं त्यांनी सांगितलं आहे.” हे वाचा-Stock Market : बापरे! फक्त 2 रुपयांच्या शेअरनं गुंतवणूकदारांना बनवलं लखपती तुम्हाला तुमच्या शहरातील सोन्याची किंमत जाणून घ्यायची असेल तर तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल करू शकता. काही वेळानंतर तुम्हाला एसएमएसद्वारे नवीन दर मिळतील. याशिवाय तुम्ही www.ibja.co किंवा ibjarates.com या वेबसाइटवरही नवीन दर तपासू शकता. हे वाचा-तुमच्या EPFO खात्यावर पैसे जमा होतात की नाही कसं चेक करायचं? वापरा ही ट्रिक सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे अनेक बनावट दागिनेही बाजारात मिळू लागले आहेत. अशा परिस्थितीत, आयएसओ (Indian Standard Organization) लोकांना खोटे दागिने ओळखण्यासाठी हॉलमार्क तपासण्याचा सल्ला देते. 18 कॅरेटवर 750, 21 कॅरेटवर 875, 23 कॅरेटवर 958 आणि 24 कॅरेट सोन्यावर 999 लिहिले आहे.