JOIN US
मराठी बातम्या / मनी / सोनं-चांदी गुंतवणूक करावी का? येत्या 15 दिवसात दर किती वाढेल; तज्ज्ञ काय म्हणतात

सोनं-चांदी गुंतवणूक करावी का? येत्या 15 दिवसात दर किती वाढेल; तज्ज्ञ काय म्हणतात

पुढच्या 15 दिवसांत सोन्याच चांदीच्या दराची काय स्थिती असेल? जाणून तज्ज्ञांकडून

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : सोन्या चांदीचे दर सध्या सतत बदलत आहेत. जवळपास 55 हजार रुपयांपर्यंत पोहोचलेल्या सोन्याच्या किंमती गुरुवारी खाली आल्या. 800 रुपयांनी बाजार बंद होताना किंमत घसरली. त्यामुळे लग्नसराईनिमित्ताने सोनं खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. मात्र अजूनही सोन्याचे दर वाढतील अशी भीती काय आहे. नव्या वर्षात किंवा लग्नासाठी सोनं खरेदी करणार असाल किंवा गुंतवणूक करणार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. पुढच्या 15 दिवसांत सोन्याची स्थिती काय असेल किंमत वाढेल की कमी होईल? पैसे आता गुंतवणं योग्य की 15 दिवस थांबायला हवं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तज्ज्ञांनी दिली आहे. याशिवाय गुंतवणुकीचा योग्य सल्लाही दिला आहे. CNBC आवाजने दिलेल्या वृत्तानुसार स्टँडर्ड चार्टर्डने सन 2023 साठी सोन्याच्या किंमतीचे लक्ष्य 2250 डॉलर प्रति औंस ठेवले आहे. निर्मल बंग यांनी 2000 डॉलर प्रति औंसचे लक्ष्य ठेवले आहे. फिचने 1850 डॉलर प्रति औंस, मेटल फोकसने 1650 डॉलर प्रति औंसचे लक्ष्य ठेवले आहे. केडिया कमॉडिटीचे एमडी अजय केडिया यांनीही पुढील 15 दिवसांची रणनिती सांगितली आहे.

Gold Silver Rate Today : चांदी 1000 तर सोनं 300 रुपयांनी स्वस्त; तुमच्या जिल्ह्यातील इथे चेक करा  

तज्ज्ञांच्या मते, अमेरिकन फेडरल बँकेनं व्याजदर वाढवल्याने त्याचा परिणाम सोन्यावर कसा होणार ते पाहावं लागणार आहे. पुढच्या 15 दिवसात सोन्याचे फार महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे जेव्हा जेव्हा व्याजदर वाढेल तेव्हा सोन्यातही तेजी पाहायला मिळेल असं मत व्यक्त केलं आहे. म्हणजे पुन्हा जानेवारी-फेब्रुवारीत फेडरल बँकेनं व्याजदर वाढवला तर सोन्याचे दर वाढू शकतात.

लग्नासाठी पैसे साठवायचे, खर्चात बचत कशी करायची?

संबंधित बातम्या

सोन्याची मागणी दुप्पट वाढत आहे. 2023 मध्ये सोन्यातील गुंतवणूक फायद्याची ठरू शकते. या 15 दिवसातील गुंतवणूक ही तुम्हाला फायदा मिळवून देणारी ठरू शकते. कारण 2023 मध्ये पुन्हा दर वाढण्याची शक्यता आहे. नव्या वर्षात सोनं 58 हजारपर्यंत जाईल असाही एक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

गुरुवारी सोन्याचे दर जवळपास 54 हजार 400 हून अधिक होते. -350 रुपयांनी सोनं खाली घसरल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे काल थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र वर्षसंपेपर्यंत सोन्याचे दर 55 हजारांचा आकडा ओलांडणार का याचीही एक ग्राहकांना भीती आहे. लग्नसराईमुळे मागणी वाढली आहे. त्यामुळे पुढचे 15 दिवस महत्त्वाचे असणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या