नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली. सोमवारी एमसीएक्सवर सोन्या-चांदीच्या किंमतीत घट झाली. आजच्या सुरुवातीच्या व्यापारात एमसीएक्सवर, डिसेंबर डिलीव्हरीसाठी असलेल्या सोन्याचे दर 0.3 टक्क्यांनी घसरून 50 हजार 679 झाले आहेत. तर चांदीचे वायदा दर 1.12% घसरून 61 हजार 479 प्रति किलो झाली आहे. ऑगस्टमध्ये सोन्याचे दर 10 ग्रॅम 56,200 च्या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचल्यापासून सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत. आतापर्यंत स्थानिक बाजारात प्रति दहा ग्रॅम 5521 रुपयांची घसरण झाली आहे. मागील सत्रात सोन्याच्या किमतीत 0.2 टक्के वाढ झाली होती तर चांदीमध्ये 0.3 टक्क्यांनी घसरण झाली. वाचा- बाजारभावापेक्षा 15% कमी किंमतीत मिळतं ‘या’ 5 शहरात सोनं, एका तोळ्याचा असा आहे दर शुक्रवारी स्वस्त झालं सोनं सराफा बाजारात शुक्रवारी सोनं स्वस्त झालं होतं. तर, शुक्रवारी चांदीचे दर वाढले. सोन्याच्या किंमती 75 रुपयांनी घसरून 51,069 रुपये झाल्या होत्या. त्याचबरोबर चांदीचा दर 121 रुपयांनी वाढून 62 हजार 933 रुपये प्रति किलो झाले आहेत. यापूर्वी गुरुवारी सोन्याचे दर 10 ग्रॅम 51,144 रुपयांवर बंद झाले होते. गुरुवारी चांदीचा भाव 62,812 रुपये प्रतिकिलो होता. वाचा- या बँकेच्या 50 शाखा बंद होणार; खर्चात 20 टक्के कपात केली जाणार विदेशी बाजारात किंमती झाल्या कमी परदेशी बाजारात सोन्याचे दर आज एक आठवड्याच्या नीचांकी पातळीवर गेले. यूएस मध्ये, प्रोत्साहण पॅकेजसंदर्भातील घोषणेमुळे डॉलर मजबूत झाला. अमेरिकेत कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर सोन्यात मोठी घसरण झाली नव्हती. परदेशी बाजारात आज स्पॉट गोल्ड 0.1 टक्क्यांनी घसरून 1,899.41 डॉलर प्रति औंस झाला. इतर मौल्यवान धातूंमध्ये चांदी 0.5 टक्क्यांनी घसरून 24.45 डॉलर प्रति औंसवर, तर प्लॅटिनम 0.7 टक्क्यांनी घसरून 895 डॉलस घसरली.