JOIN US
मराठी बातम्या / मनी / सोन्याचे दर गाठणार उच्चांक! वर्षाअखेरीस 55 हजारांपर्यंत जाण्याची शक्यता

सोन्याचे दर गाठणार उच्चांक! वर्षाअखेरीस 55 हजारांपर्यंत जाण्याची शक्यता

2019मध्ये 23.74 टक्के रिटर्न दिल्यानंतर सोन्याच्या किंमती अशाच वाढत राहण्याचा अंदाज आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 14 एप्रिल : 2019मध्ये 23.74 टक्के रिटर्न दिल्यानंतर सोन्याच्या किंमती अशाच वाढत राहण्याचा अंदाज आहे. 2020 च्या अखेरपर्यंत सोन्याच्या किंमती 1,800 डॉलर प्रति औंस म्हणजेच साधारण 50,000 ते 55,000 प्रति तोळापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. सध्या अर्थव्यवस्थेमध्ये असणारी अस्थिरता, अर्थव्यवस्थेबाबत असणारी भीती या सर्व कारणांमुळे सोन्याच्या पुढील 2-3 वर्षांत आणखी वाढण्याची शक्यता आहे. (हे वाचा- लॉकडाऊन संपल्यानंतर विमानप्रवास परवडणार का? जाणून घ्या ही महत्त्वाची बाब ) आतापर्यंत 2020 या वर्षात सोन्याच्या किंमतीमध्ये 6,794 रुपयांची म्हणजेच 17.31 रुपयांची वाढ झाली आहे. 2020 या वर्षामध्ये सोन्यामधून 15.19 इतका रिटर्न मिळाला आहे. मनीकंट्रोलला दिलेल्या मुलाखतीमध्ये पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सचे (PNG Jewellers) मॅनेजिंग डिरेक्टर डॉ. सौरभ गाडगीळ यांनी systematic investment plan (SIP) या पद्धतीने सोनेखरेदी करण्यासंदर्भात सुचवले आहे. रुपये 41,000 मध्ये गुंतवणूक करणे चांगली सुरूवात ठरू शकते, असही ते म्हणाले. (हे वाचा- COVID-19 : ‘या’ कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मोठा झटका, पगारात होणार 35 टक्के कपात ) सध्या जगासमोर आर्थिक संकट आहे. जागतिक आर्थिक संकटाच्या काळात सोने हा मौल्यवान धातू आपली क्रयशक्ती समता टिकवून ठेवते. सोन्याकडे एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. त्याचप्रमाणे सोन्यामध्ये गुंतवणूक हा एकमेव सुरक्षित पर्याय लोकांसमोर असतो. इतिहासाचे दाखले देऊन सिद्ध करता येईल की कोणत्याही युद्धात किंवा संकटाच्या काळात नागरिकांनी सोन्याकडे गुंतवणुकीचा महत्त्वाचा पर्याय म्हणून पाहिले आहे. सध्या भारतीय किरकोळ गुंतवणुकदारांकडे 10 ते 15 टक्के सोने आहे, पुढील दोन वर्षात ही संख्या 30 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. गाडगीळ यांनी दिलेल्या माहितीनुसार चांदीची खरेदी गुंतवणूक म्हणून करू नये आणि मुख्यत: घरामध्ये पुजेच्या साहित्यात चांदीचा वापर होतो. संपादन- जान्हवी भाटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या