JOIN US
मराठी बातम्या / मनी / Gold Price Today: 18 महिन्यांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचला Gold Rate, चांदीचा भावही वधारला

Gold Price Today: 18 महिन्यांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचला Gold Rate, चांदीचा भावही वधारला

आंतरराष्ट्रीय बाजारासह भारतीय बाजारातही सोने दरात सोमवारी अचानक मोठी तेजी आली आहे. सोन्यासह चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 7 मार्च : रशिया - युक्रेन युद्धादरम्यान (Russia-Ukraine War) जागतीक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 14 वर्षांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचल्या आहेत. रशिया - युक्रेन युद्धाचा जगभरात परिणाम होतो आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे सोन्याच्या दरावरही (Gold) मोठा परिणाम होत असून भाव सतत वाढत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारासह भारतीय बाजारातही सोने दरात सोमवारी अचानक मोठी तेजी आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 2000.69 डॉलरवर पोहोचलं आहे. हा दर मागील 18 महिन्यातील सर्वोच्च दर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीमुळे भारतीय बाजारातही MCX वर सोन्याचा वायदे भाव (Gold Price Today) 1.8 टक्क्यांच्या तेजीसह 53,500 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. सोन्यासह चांदीच्या दरातही (Silver Price Today) मोठी वाढ झाली आहे. MCX वर चांदी 1.5 टक्क्यांच्या वाढीसह 70173 रुपये प्रति किलोग्रॅमवर आहे. गुंतवणुकदार सोन्याप्रमाणेच चांदीमध्ये मोठी गुंतवणूक करत आहेत, त्यामुळे चांदीचा भावही वधारला असल्याचं आयआयएफएल सिक्योरिटीजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांनी सांगितलं.

हे वाचा -  क्रूड ऑइलच्या वाढत्या किमतीचा Petrol Diesel वर परिणाम? काय आहे आजचा भाव

रशिया - युक्रेनमधील युद्धामुळे जगभरातील आर्थिक बाजारपेठांमध्ये निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे गुंतवणुकदार जोखमीच्या पर्यायांमध्ये गुंतवणूक टाळत आहेत. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे मोठा कल आहे. युद्धामुळे अनेक गुंतवणुकदारांनी गोल्ड ETF मध्ये मोठी गुंतवणूक केली, त्यामुळे सोने दरात आणखी मजबूती आली आहे. कशी तपासाल सोन्याची शुद्धता - तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. ‘BIS Care App’ द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.

हे वाचा -  रशिया-युक्रेन युद्धामुळे भारतात खतांच्या किंमती वाढणार? पाहा काय आहे कारण

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर - सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता. रशिया आणि युक्रेनमधील (Russia Ukraine conflict) वाढत्या तणावामुळे सोने दरावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. जगभरातील शेअर बाजारात अनिश्चिततेचं वातावरण आहे. त्यामुळे गुंतवणुकदार पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळले असल्याचं चित्र आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या