मुंबई : डिसेंबर महिना म्हणजे लग्नसराई आणि लग्न सराई म्हटलं की सोनं खरेदी करणं आलंच. तुळशी विवाहानंतर लगीन घाई सुरू होते. मात्र आता लगीन घाईआधी सोनं खरेदीची घाई करायला हवी. कशाला म्हणाजे डिसेंबर अखेरपर्यंत सोन्याचे दर पुन्हा गगनाला भिडण्याची शक्यता आहे. लग्नसराईत सोन्याची मागणी वाढणार त्यामुळे दर वाढण्याची शक्यता आहे. सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 1 डिसेंबरपासून 2022 पासून सोनं आणि चांदीचे दर वाढताना दिसत आहेत. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) सोनं 53 हजार रुपयांच्या वर ट्रेड करत आहे. त्याचबरोबर चांदीचा भावही आज 64 हजारांच्या वर ट्रेड करत आहे. सोन्याचा भाव सध्या 3.5 महिन्यांच्या विक्रमी स्तरावर आणि चांदी 7 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर ट्रेड करत आहे.
एक नंबर! ऐन लग्नसराईत 50 हजारापेक्षा स्वस्त झालं सोनं, 24 ते 18 कॅरेट पटापट चेक करा दर2 डिसेंबर रोजी शेअर मार्केट सुरू होताच सोनं 90 रुपयांनी खाली आलं आहे. तरीही 53,820 रुपये किलोमागे मोजावे लागत आहेत. तर चांदीच्या किलोसाठी 65,180 रुपये मोजावे लागत आहेत. सोन्याचा भाव ५३ हजार रुपयांच्या पुढे सोमवारी सकाळी 10 वाजता मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव 0.83 टक्क्यांच्या वाढीसह 53,810 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे. सोन्याचे दर लवकरच बाजारात नवा रेकॉर्ड स्तर बनवू शकतात. नोव्हेंबरमध्ये सोन्याच्या दरात 2500 रुपये प्रति 10 ग्रॅमची वाढ झाली आहे. लग्नासाठी दागिने खरेदी करायला लोनची गरज आहे? कसं घेता येतं लोन याशिवाय चांदीच्या दराबाबत बोलायचे झाले तर मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर आज सकाळी 10 वाजता चांदी 2.23 टक्क्यांनी वाढून 65,200 रुपये प्रति किलो झाली आहे. नोव्हेंबरमध्ये चांदीच्या दरात 3800 रुपये प्रति किलोने वाढ झाली आहे. जागतिक बाजारातही अशीच वाढ झाली तर देशांतर्गत बाजारात सोन्याचा भाव ५६ हजार रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
सोनं-चांदीसोबत या गोष्टी महागणार, सरकारच्या ‘या’ निर्णयाचा होणार परिणामत्याचबरोबर सोन्याची आतापर्यंतची विक्रमी पातळी 56200 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, जी 2020 साली बनवण्यात आली होती. सध्या सोने विक्रमी पातळीवरून सुमारे 3400 रुपयांनी स्वस्त मिळत आहे.