मराठी बातम्या /बातम्या /मनी /

लग्नासाठी दागिने खरेदी करायला लोनची गरज आहे? कसं घेता येतं लोन

लग्नासाठी दागिने खरेदी करायला लोनची गरज आहे? कसं घेता येतं लोन

कर्ज मिळवण्यासाठी कसा अर्ज करावा? कसं लगेच लोन मिळेल सविस्तर वाचा

कर्ज मिळवण्यासाठी कसा अर्ज करावा? कसं लगेच लोन मिळेल सविस्तर वाचा

कर्ज मिळवण्यासाठी कसा अर्ज करावा? कसं लगेच लोन मिळेल सविस्तर वाचा

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई: सध्या महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. जीवनावश्यक वस्तूंसह इतर सर्वच गोष्टींच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना अगदी आपल्या महिन्याच्या खर्चाचं नियोजन करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशातच जर घरामध्ये लग्नसोहळा असेल तर मग प्रचंड खर्च करावा लागतो.

लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण मानला जातो. त्यामुळे तो लग्न समारंभ अगदी दणक्यातच पार पडला पाहिजे, असं नियोजन केलं जातं. लग्न सोहळ्याचं नियोजन करताना सोहळ्याचं स्थान, जेवण, डेकोरेशन यासोबतच सोनं खरेदी हादेखील महत्त्वाचा घटक आहे.

सामान्यपणे आपल्याकडे वधूचे कुटुंबीय आणि वराचे कुटुंबीय दोघेही आपापल्या इच्छेप्रमाणे वधू-वरांसाठी सोन्याचे दागिने खरेदी करतात. सध्या सोन्याचे दर गगनाला भिडले असल्यामुळे सोनं खरेदीसाठी लोन घेण्याची गरज पडू शकते किंबहुना काहीजणांना लोनची गरज पडतेच.

2021मधील एका सर्वेक्षणानुसार, 21 टक्के तरुण-तरुणी लग्नांतर फिरायला जाण्यासाठी तर 8 टक्के जोडपी लग्नानंतर जीवनशैलीत बदल करण्यासाठी कर्ज घेण्यास इच्छुक आहेत.

काही बँका विवाहसोहळ्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी लोन देत नाहीत. त्यामुळे पर्सनल लोन घेऊन ती रक्कम लग्नासाठी खर्च केली जाते. पण, काही बँकांनी आता 'वेडिंग लोन'ची सुविधा सुरू केली आहे.

या लोनचा वापर करून तुम्ही लग्नासाठी दागिन्यांची खरेदी करू शकता. कर्ज घेताना सावधगिरी बाळगणं आणि कर्जासाठी योग्य कंपनी निवडणं आवश्यक आहे. कर्ज मिळवण्याचा अर्ज करण्यापूर्वी व्याज दर, वितरण कालावधी, प्रक्रिया शुल्क आणि इतर संबंधित शुल्क यासारख्या काही बाबींचा विचार करणं आवश्यक आहे.

लग्नासाठी लोन मिळवण्यासाठी आवश्यक असलेले पात्रता निकष:

वय आणि आर्थिक स्थिती: लग्नासाठी लोन देताना अर्जदारचं वय आणि रोजगाराची स्थिती हे प्रमुख पात्रता निकष लावले जातात. अर्जदाराचं वय कमीतकमी 25 वर्षं किंवा त्यापेक्षा जास्त असलं पाहिजे. वयाची अट पूर्ण करणाऱ्या आणि स्थिर नोकरी असलेल्या अर्जदाराला वित्त संस्था सहज लोन देतात. स्टार्ट-अप, एमएसएमई युनिट्स आणि स्वयंरोजगार असलेल्या लोकांपेक्षा एमएनसीमध्ये काम करणार्‍या अर्जदारांना लोन देण्यास अधिक प्राधान्य दिलं जातं.

सिबिल स्कोअर: एखाद्या व्यक्तीनं लग्नासाठी कर्ज मिळवण्यासाठी केलेला अर्ज मंजूर करायचा की नामंजूर करायचा हे सिबिल स्कोअर बघून ठरवलं जातं. लग्नासाठी कर्जाचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीचा सिबिल स्कोअर 800च्या वर असावा अशी भारतातील कर्ज देणार्‍या प्रमुख कंपन्यांची मागणी आहे. क्रेडिट कार्डचे हप्ते भरण्यात आणि कर्जाची परतफेड करण्यास तुम्ही किती सक्षम आहात हे या स्कोअरवरुन निश्चित केलं जातं.

मासिक उत्पन्न: तुमचं मासिक उत्पन्न लक्षात घेऊन तुम्ही कर्जाची परफेड कराल की नाही, याचा अंदाज घेतला जातो. प्रत्येक महिन्यात कर्जाचा हप्ता भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत की नाही हे पाहण्यासाठी, कर्ज देणारी कंपनी किंवा बँक तुमच्या मासिक उत्पन्नाचे पुरावे मागते. लग्नासाठी घेतलेल्या लोनच्या परतफेडीचा कालावधी साधारण पाच ते सात वर्षं असतो.

कर्ज मिळवण्यासाठी कसा अर्ज करावा?

कर्ज देणाऱ्या बहुतेक कंपन्या ओळख पडताळणी आणि अर्ज पडताळणीसाठी युटिलिटी बिल, पासपोर्ट, आधार कार्ड, ओळखीचा पुरावा म्हणून पॅन कार्ड, ड्राइव्हिंग लायसन्स, पासपोर्ट आणि उत्पन्नाचा पुरावा म्हणून सॅलरी स्लिप किंवा बँकेचं स्टेटमेंट मागतात. ही सर्व कागदपत्रं आणि पात्रता निकषांची पूर्तता करणारी व्यक्ती लग्नासाठी लोन मिळवू शकते.

बजाज फिनसर्व्हसारख्या कंपन्या सध्या लग्नासाठी 25 लाख रुपयांपर्यंत लोन देतात. या पैशांचा वापर करून तुम्ही लग्न समारंभासाठी दागिने खरेदी करू शकता. सोनं हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय मानला जातो. त्यामुळे लग्नाच्यावेळी सोनं खरेदी करून तुम्ही एक प्रकारची सुरक्षित गुंतवणूक करू शकता.

First published:

Tags: Gold, Gold and silver, Gold price, Home Loan, Instant loans, Loan